Zilla Parishad School  Agrowon
ताज्या बातम्या

Z. P. School : शेलू ग्रामस्थांनी लावले शाळेला कुलूप

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळा शेलू (शे) येथील शिक्षक वेळेवर शाळेत येत नाही.

Team Agrowon

आर्णी, यवतमाळ : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळा (Zilla Parishad School ) शेलू (शे) येथील शिक्षक (Teacher) वेळेवर शाळेत येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वारंवार सांगूनही हा प्रकार बंद न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर शाळेच्या (Zilla Parishad School) मुख्य प्रवेशद्वारालाच कुलूप लावले. एवढेच नव्हे, तर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा भोंगळ कारभार गटशिक्षण अधिकारी किशोर रावते यांना व्हिडिओ कॉल करून लाइव्ह दाखविण्यात आला आहे.

शाळेच्या वेळेवर न येणाऱ्या शिक्षकांवर वरिष्ठ कोणती कार्यवाही करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. शेलू (शे.) येथे जिल्हा परिषद शाळेत सकाळी अकरा वाजून गेले तरी काही शिक्षक वेळेवर आले नसल्याची बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने शिक्षक शाळेत वेळेवर का येत नाही, असा जाब विचारत आंदोलन केले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. त्यासाठी त्यांनी पंचायत समिती गटशिक्षक अधिकारी किशोर रावते यांना व्हिडिओ कॉलवर शाळेचा अफलातून कारभार दाखवत शाळेच्या मेनगेटला कुलूप लावले.

शेलू येथून मला ग्रामस्थांनी व्हिडिओ कॉलवरून दाखविले. उशिरा येणाऱ्या शिक्षकांची चौकशी करून कारणे दाखवा, नोटीस बजावण्यात येणार आहे. तसेच उशिरा येणाऱ्या शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कपात करण्यात येईल.

-किशोर रावते, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती, आर्णी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seafood Export: अमेरिकेच्या आयातशुल्क वाढीचा कोळंबी निर्यातीवर परिणाम, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंची माहिती

FSSAI Registration: दूध उत्पादक-विक्रेत्यांना एफएसएसएआय नोंदणी सक्तीची

Unseasonal Rain: माकणी परिसरात पाऊस, गारपीट

Krishi Kumbh Exhibition: ‘कृषिकुंभ’कडे मंत्री, लोकप्रतिनिधींची पाठ

Unseasonal Rain Damage: ‘अवकाळी’ने रब्बी पिकांसह फळबागांना फटका

SCROLL FOR NEXT