New Krishi Bhavan  Agrowon
ताज्या बातम्या

Shasan Aplya Dari' Campaign : ‘शासन आपल्या दारी’ अभियान पुणे जिल्‍ह्यात प्रभावीपणे राबवा

Maharashtra Government Scheme : जिल्हाधिकारी डॉ. देशमुख ः ३० मे रोजी अभियान

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Pune News : सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनातर्फे ‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aplys Dari' Campaign ) हे अभियान राबविण्यात येत असून, त्याद्वारे शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनेचा लाभ पोहोचवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाबाबत दूरदृश्‍यप्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘हे अभियान सामान्य नागरिकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असून, जिल्ह्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करायची आहे. अभियानांतर्गत नागरिकांना देण्याच्या सेवा व योजनांची माहिती राज्य शासनाने दिली आहे.

त्यांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. विविध शासकीय यंत्रणांनी अधिकाधिक सेवांचा यात समावेश करावा.

स्थानिक लोकप्रतिनिधींना यात सहभागी करून घ्यावे. गांभीर्याने, पारदर्शकपणे आणि संवेदनशीलतेने शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचतील याची दक्षता घ्यावी.’’

जिल्ह्यात ३० मे रोजी तालुकास्तरावर ‘शासन आपल्या दारी’ मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून, ४० विविध सेवा व योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात दीड ते दोन लाख नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

कदम म्हणाल्या, ‘‘३० मे रोजी होणाऱ्या शिबिरासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्यात यावा. योग्य नियोजनाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा.

नागरिकांना मेळाव्याची माहिती देण्यासाठी आवश्यक पूर्वप्रसिद्धी करावी. जिल्हास्तरावरील कार्यक्रमाचे देखील नियोजन करण्यात यावे,’’ असे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Coromandel International: ग्रामविकासाला कोरामंडलच्या ‘ग्रोमोर ग्राम’ची जोड

Ahilyanagar Sugarcane Price Protest: अहिल्यानगरमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार, राजू शेट्टींच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

OTS Scheme Update: परभणी जिल्ह्यात ४७५९ शेतकरी ‘ओटीएस’मध्ये

Rabi Jowar Sowing: ज्वारी पेरणीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल

Agricultural Land: सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनीला धक्का नाही! पण 'त्या' पडीक शेतजमिनी ३ वर्षांत पिकाखाली आणा- बावनकुळे

SCROLL FOR NEXT