Kolhapur Shahuwadi agriculture department agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Shahuwadi : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुका कृषी अधिकाऱ्यांविना, अनेक पदे रिक्तच

Shahuwadi : शाहूवाडी तालुक्यातील कृषी विभागात सध्या प्रभारी अधिकाऱ्यांवर असल्याने निर्णय घेण्यासाठी काही अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे.

sandeep Shirguppe

Agricultural Officer : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात भात शेती मोठ्या प्रमाणात घेतली जाते. दरम्यान या तालुक्यातील अर्थकारण हे बऱ्यापैकी शेतीवर अवलंबून आहे. परंतु या तालुक्यातील अनेक कृषी पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांना कोणाकडे दाद मागायची हा पर्याय उभार राहिला आहे.

शाहूवाडी तालुक्यातील कृषी विभागात सध्या प्रभारी अधिकाऱ्यांवर असल्याने निर्णय घेण्यासाठी काही अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील मंजूर ४७ पैकी २३ पदे रिक्त असल्याने कृषी विभागाला कर्मचारी कधी मिळणार हा सवाल उपस्थित केला जात आहे.

सर्वात जास्त कृषी सहाय्यक ३६ मंजूर पदांपैकी १९ पदे रिक्त असल्याने या शेती तंत्रज्ञानाची अवस्था बिकट बनली आहे. ४७ पैकी २३ पदे रिक्त असल्याने शाहूवाडी तालुक्यात कृषी योजनांचा बोजवारा उडाला आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय महत्त्वाचे मानले जाते. परंतु तालुका कृषी अधिकारी अभिजित धेडे यांची सोलापूरला बदली झाल्याने एक महिन्यापासून हे पद रिक्त आहे.

शाहूवाडी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी (१), मंडल कृषी अधिकारी (२), कृषी अधिकारी (१), कृषी सहाय्यक (१९) असे एकूण २३ पदे रिक्त असल्याने राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Debt: मुर्दाड व्यवस्थेचे बळी

Local Body Elections: बारामतीत नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी

Leopard Attack: राजगडमध्ये बिबट हल्ल्यांत वाढ

Road Safety: बेशिस्त ऊस वाहतुकीला दणका

Illegal Money lenders: पाच सावकारांना तीन दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT