Fodder Shortage Agrowon
ताज्या बातम्या

Fodder Shortage : कोरेगाव उत्तर परिसरात चाऱ्याची तीव्र टंचाई

Monsoon Rain Update : मॉन्सूनने दडी मारल्याने कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात तीव्र चाराटंचाई निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Satara News : मॉन्सूनने दडी मारल्याने कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात तीव्र चाराटंचाई निर्माण झाली आहे. पशुपालकांवर पशुधन विकण्याची वेळ आली आहे. विकतचा चारा परवडत नसून शासनाने या भागातील पशुधन वाचविण्यासाठी चारा छावणी उभारावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

या वर्षी हवामान बदलामुळे उन्हाळी पावसासोबतच मॉन्सूनने हुलकावणी दिली आहे. कडब्याचे दर कडाडले आहेत. खरीप हंगामातही पावसाने दडी मारल्याने दूध उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे या भागात लवकर चारा छावणी उभारावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

ओल्या व सुक्या चाऱ्याची मागणी वाढली आहे. सध्या गोळी पेंडीचे दरदेखील वाढले आहेत. भांडवली खर्च वाढल्यामुळे दूध व्यवसाय तोट्यात आहे. कडक उन्हामुळे माळरानावर उगवलेले गवतही वाळू लागले आहे.

जनावरे विकण्याची वेळ

कडबा, मका व गवताच्या टंचाईमुळे उन्हाळ्यापासून मुरघास विकत घ्यावा लागत आहे. त्याला प्रतिकिलो ९ रुपये दर द्यावा लागत आहे. खरीप हंगामातील पेरा वाया गेल्याने आधीच अडचणीत असलेला शेतकरी चाराटंचाईच्या गर्तेत सापडला आहे. कर्ज काढून जनावरे विकण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan : एक ऑगस्टपासून पीककर्ज प्रक्रिया ऑनलाइन

Ujani Dam Water Discharge : उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढवला

Maize Sowing : देशात मका लागवड १५ टक्क्यांनी वाढली

Dragon Fruit Rate : पहिल्या बहरातील ड्रॅगन फ्रूटची विक्री अंतिम टप्प्यात

Heavy Rainfall Maharashtra : मुसळधार पावसामुळे धरणे भरण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT