Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी

उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी राज्यावर स्वारी केल्याने राज्यात गारठा वाढला आहे. तापमानात मोठी घट झाल्याने उत्तर खानदेशाला हुडहुडी भरली आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी (Cold Wind) राज्यावर स्वारी केल्याने राज्यात गारठा (Cold Weather) वाढला आहे. तापमानात मोठी घट झाल्याने उत्तर खानदेशाला हुडहुडी भरली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पारा १० अंशांखाली आल्याने थंडी वाढली आहे. धुळे, निफाडसह जळगाव, पुणे, यवतमाळ येथे थंडीची लाट (Cold Wave) आली आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी वाढतच असून, मध्य प्रदेशातील खजुराहो येथे रविवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रात धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे यंदाच्या हंगामातील नीचांकी ७ अंश, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

धुळे आणि निफाडसह, जळगाव, पुणे आणि यवतमाळ येथे किमान तापमानाचा पारा १० अंश किंवा त्यापेक्षा अधिक घसरला असून, किमान तापमानात ४.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्याने थंडीची लाट आली आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आवारातही किमान तापमान ८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात अनेक ठिकाणी दिवसाही गारठा जाणवत होता. आज (ता. २१) अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढली

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. ही तीव्र कमी दाब प्रणाली (डिप्रेशन) कराईकलपासून ६३० किलोमीटर पूर्वेकडे तर चन्नईपासून ६७० किलोमीटर आग्नेयेकडे होती. वायेव्यकडे सरकणारी ही प्रणाली उद्यापर्यंत (ता. २२) तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे.

रविवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.१ (९.७), जळगाव ३०.० (८.५), धुळे २९.० (७), कोल्हापूर २९.६ (१५.२), महाबळेश्वर २४.१(१०.६), मालेगाव - (१८), नाशिक २७.९ (९.८), निफाड २९.४ (७.४), सांगली ३०.२(१३.३), सातारा २८.१(१२.६), सोलापूर ३१ (१४.६), सांताक्रूझ ३३.३(१९.८), डहाणू ३१.८ (१७), रत्नागिरी ३३.४ (१९.७), औरंगाबाद २८.५ (११.१), नांदेड २९.२ (१४.४), परभणी - (११.५), अकोला ३०.८ (१२.८), अमरावती ३० (११.७), बुलडाणा २८.६ (१३), ब्रह्मपुरी २९.८ (१३.१), चंद्रपूर २८ (१३.२), गडचिरोली २८(१२.६), गोंदिया २८.२(१०.४), नागपूर २८.७ (११.४), वर्धा २८ (१२.४), वाशीम - (१३), यवतमाळ २९.५ (१०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurment : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना १० हजार ४०० कोटी रुपये दिल्याची केंद्र सरकारची माहिती; सीसीआयच्या खरेदीपासून शेतकरी मात्र वंचित

Maharashtra Unseasonal Rain: उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; राज्यात कोकण वगळता वादळी पावसाचा इशारा

Village Governance: ग्रामसभा आणि ग्रामस्तरावरची अंमलबजावणी

Dam Water Storage: मंगरूळ, सुकी, अभोडा धरणांत जलसाठा मुबलक

Vidarbha Irrigation Projects: विदर्भातील ५ सिंचन प्रकल्पांची कामे भूसंपादनाअभावी प्रलंबित- गिरीश महाजन

SCROLL FOR NEXT