Insecticide  Agrowon
ताज्या बातम्या

Insecticide : उत्पादन, विक्री, वापरास प्रतिबंधित कीटकनाशकांचा साठा जप्त

जिल्ह्यात बनावट कीटकनाशके व बुरशीनाशकांची विक्री अनधिकृत विक्रेत्यांकडून होत असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते.

Team Agrowon

नाशिक : जिल्ह्यात बनावट कीटकनाशके (Insecticide) व बुरशीनाशकांची विक्री अनधिकृत विक्रेत्यांकडून होत असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. कृषी विभागाच्या भरारी पथकाने जप्त नमुने कृषी विभागाच्या कीटकनाशक विश्लेषण प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर ते अप्रमाणित असल्याचे समोर आले होते.

असे असताना आता उत्पादन, विक्री व वापरास प्रतिबंधित कीटकनाशकांच्या विक्रीचा प्रकार समोर आला आहे. हा साठा जप्त करत कृषी विभागाने विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

जिल्ह्यात अधिकृत कीटकनाशके विक्रेत्यांकडून उत्पादन, विक्री व वापरास प्रतिबंधित ‘फोरेट’ हे कीटकनाशक उपलब्ध करून दिले जात असल्याचा संशय कृषी विभागास होता. त्यानुसार सापळा रचून शुक्रवारी (ता. २५) ठाणगाव (ता. सिन्नर) येथील मे. गुरुदत्त कृषी सेवा केंद्राच्या गोदामात विक्री हेतू अॅग्रीफिल्ड इंडस्ट्री (तामिळनाडू) या कंपनीचा ‘फोरेट’ नावाच्या कीटकनाशकाचा १५ किलो साठा विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांनी कृषी सहायक कुसुम तांबे व सचिन नागरे यांच्या मदतीने जप्त केला.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, गुणवत्ता नियंत्रण तंत्र अधिकारी संजय शेवाळे, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बोगस निविष्ठांबाबत जिल्हा व विभागीय तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन वाघ यांनी केले.

विक्री परवाना रद्द करण्याची शिफारस

कीटकनाशक विक्री परवानाधारक सुधाकर किसन काकड यांच्याविरुद्ध कीटकनाशक कायदा १९६८, कीटकनाशक नियम १९७१, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत पोलिस ठाणे सिन्नर येथे विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील यांनी फिर्याद दाखल केली. यासह कृषी सेवा केंद्राचा कीटकनाशक विक्री परवाना रद्द करण्याची शिफारस परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी १२ टक्के ओलाव्याच्या अटीनेच सुरू

Natural Farming : नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानास मंजुरी

Sugarcane Crushing : सोलापुरातील ९ कारखान्यांत ३ लाख ४४ हजार टन गाळप

Sugarcane Harvesting Workers : ऊसतोडणी मजूर कारखान्यावर आल्याने परिसर गजबजला

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली

SCROLL FOR NEXT