Fish Farming Agrowon
ताज्या बातम्या

Mangur Fish : मानवी आरोग्याला घातक मागूर माशांचा साठा जप्त

विदेशी मागूर हा अति मांसहारी मासा आहे. यामुळे मानवास हानिकारक कर्करोगजन्य आजार अथवा इतर आजार होण्याची शक्यता असते.

Team Agrowon

Fish Farming News नाशिक : विदेशी मागूर हा अति मांसहारी मासा आहे. यामुळे मानवास हानिकारक कर्करोगजन्य आजार अथवा इतर आजार होण्याची शक्यता असते.

त्यामुळे नाशिक विभागामध्ये मागूर मासा उत्पादन व विक्रीवर मत्स्यव्यवसाय विभाग बारकाईने नजर ठेवून आहे.

या पार्श्वभूमीवर आगर टाकळी येथील एका घरात व घराबाहेर जवळपास तीनशे किलो मागूर मासा जप्त करण्यात आला आहे.

या संदर्भात मत्स्य व्यवसाय विभाग व उपनगर पोलिस यांनी संयुक्तरित्या कारवाई केली आहे.

केंद्र शासनाच्या निर्णयानुसार विदेशी मागूर (थाई मागूर/आफ्रिकन मागूर) या माशांचे मत्स्यसंवर्धन करणे, वाहतूक व विक्री करण्यास बंदी आहे. त्यामुळे नाशिक विभागातील नाशिक व नगर जिल्ह्यात कारवाया सुरू आहेत.

मत्स्य व्यवसाय विभागातील अधिकाऱ्यांना माहिती मिळाली असता, संशयित घराजवळ भेट दिली. यावेळी संशयित किशोर काशिनाथ आडणे यांच्या घराच्या बाहेरील टाकीत व घरात हा मासा आढळून आला.

जप्त मागूरचा साठा महापालिकेच्या इन्सिनेटरमध्ये नष्ट

नाशिक महापालिकेच्या चाळीस किलोमीटर परिघात मागूर मासा आढळून कारवाई केल्यास नाशिक महापालिकेच्या इन्सिनेटरमध्ये या माशाची विल्हेवाट लावण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने नाशिक महापालिकेला यासंबंधी पत्र दिले होते.

यावर नाशिक महापालिकेने तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार कारवाई करून जप्त केलेल्या माशांचा साठा पहिल्यांदाच महापालिकेच्या खत प्रकल्पात असलेल्या इन्सिनेटरमध्ये नष्ट करण्यात आल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाचे उपायुक्त संजय वाटेगावकर यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Rajan Patil: सहकार परिषद कृतिशील होईल

Indigenous Cattle: ही ‘लक्ष्मी’ जपणार कोण?

Agriculture Pest Infestation: मूग, उडीद पिकांवरील किडींचे व्यवस्थापन

Home Industry: नाचणी, भाजीपाल्याच्या पापडांची चव न्यारी

Rural Development: ग्रामविकास, बचत गटाला चालना देणारी ‘वनश्री’

SCROLL FOR NEXT