Satej Patil vs Amal Mahadik agrowon
ताज्या बातम्या

Satej Patil vs Amal Mahadik : 'राजाराम कारखाना 'महाडिक प्रा. लिमिटेड' करण्याचा ठराव करा'

sandeep Shirguppe

Rajaram Sahkari Karkhana Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक गदारोळ होणारी कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची शुक्रवारी (ता. २९) वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी गटाचे नेते आमदार सतेज पाटील यांनी सभासदांच्या गाठीभेटी घेत रान उठवण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान काल सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राजारामच्या कारभारावर बोट ठेवत सत्ताधाऱ्यांसमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले की, राजाराम कारखान्याचे कोल्हापूरमधील कार्यक्षेत्र वाढवत आहात, हे समजू शकतो. मात्र, सांगली जिल्ह्यातील येलूर आणि वाळवा तालुक्यातील सभासद करता यावेत, यासाठीच पोटनियम बदलला जात आहे. यापेक्षा आयत्यावेळेचा एकच विषय आणून राजाराम कारखाना 'महाडिक प्रा. लिमिटेड' करण्याचा 'ठराव करावा', अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी आज केली.

चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या विस्ताराबाबत राज्याच्या सहकार विभागाला प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे याबाबत तक्रार करणार असल्याचेही पाटील म्हणाले. तसेच असा महाराष्ट्रात कोठेही नियम नाही. असा नियम राजाराम कारखान्यात लागू केला जात आहे. कारखान्याकडून वेळेत ऊसतोड होत नाही.

१२२ गावांतील अनेक सभासदांना ऊसतोड दिली जात नाही. यामुळे ९ हजार सभासदांनी ऊस घातलेला नाही. असे असताना आणखी ४२ गावांतील सभासद कशासाठी हवे आहेत? कारखाना विस्तारवाढीसाठी ज्या-त्या गावातील कारखान्यांचा ना हरकत दाखला घ्यावा लागणार आहे.

प्रादेशिक साखर सहसंचालकांनी त्यांना परवानगी देताना याची माहिती घ्यावी लागणार आहे. विद्यमान संचालक मंडळातील कोणाला ठेवायचे आणि कोणाला काढायचे हे सांगली जिल्ह्यातील सभासद ठरवू शकतात. त्यामुळे, विद्यमान संचालकांनीही सावध झाले पाहिजे असेही सतेज पाटील म्हणाले.

आमदार सतेज पाटलांचे प्रश्न

जुन्या ९,५० सभासदांचा ऊस उचलता येईना, मग वाळव्यातील ऊस कसा गाळप करणार?

७/१२ पत्रकी मालकी हक्काचे क्षेत्र नसलेले कुटुंबप्रमुखाच्या मान्यतेने सभासद होऊ शकतात.

सहकार कायद्यात तरतूद नसताना हे कसे?

उमेदवारीसह सूचक, अनुमोदकसाठी पाचपैकी चार वर्षें ऊस पुरवठ्याची सक्ती अन्यायकारक, पोटनियम दुरुस्तीस विरोध

कारखान्याचे सुमारे १२५ ते १५० कोटी शॉर्ट मार्जिन परतीच्या व बिनपरतीचे ४ कोटी ९४ लाख ८८ हजाराचे बेकायदेशीर डिबेंचसममध्ये वर्ग केले.

कारखान्याच्या जमिनींचे मूल्यांकन वाढवून वित्तीय संस्थांची फसवणूक सहवीज व इथेनॉल प्रकल्पाला विरोध नाही, पण १५० कोटींचे कर्ज घेऊन सहवीज प्रकल्पातून किती उत्पन्न मिळणार?

सभासदांना किती फायदा होणार?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT