District Bank
District Bank Agrowon
ताज्या बातम्या

Satara District Bank : कर्जपुरवठ्यात सातारा जिल्हा बँक राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

Team Agrowon

Satara District Bank : राज्यात जास्तीत जास्त कर्जपुरवठा केलेल्या बँकांचा शासनाने गौरव केला असून, यामध्ये राज्यात कर्जपुरवठ्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने (Satara District Central Bank) दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर, राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनेक उद्योजकांना बँकेने अल्प व्याजदराने कर्जपुरवठा केलेला आहे.

यामध्ये शेतीमालावर व अन्न मालावर प्रक्रिया करणारा कोणताही उद्योग या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असून यासाठी केंद्र सरकारतर्फे एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान मंजूर केले जाते.

मराठा समाजातील उद्योजकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व इतर समाजातील व्यवसायिकांना ज्या त्या महामंडळाचे योजनेतून व्याज परतावा योजनेअंतर्गत शुन्य टक्के दराने बँकेमार्फत कर्जपुरवठा केला जात आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्ह्यातील शेतकरी व उद्योजकांना अनेकविध योजनांतर्गत अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करत असून त्यांचे आर्थिक पतमान उंचविण्यास बँकेचा सिंहाचा वाटा आहे.

व्यवसाय उभारणीसह विविध योजनांतर्गत मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ३५ टक्क्यांपर्यंत शासन अनुदान मिळत असून, महाराष्ट्र शासन पुरस्कृत विविध जाती-जमातीसाठी व्याज परतावा योजना, व्यवसाय उभारणीसाठी कंपो लोन नं. ३ कर्ज योजना, रेक ओव्हर कर्ज योजना, नवीन दुचाकी व चारचाकी कर्ज योजना, गृहसंकल्पपूर्ती कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, किसान सन्मान कर्ज योजना, कॅश क्रेडिट कर्ज योजना, नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी सॅलरी पॅकेज व ओव्हरड्राफ्ट कर्ज योजना आदी योजनांचा समावेश आहे.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी बँक कर्जपुरवठा करीत असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बँकेच्या नजीकच्या शाखेत भेट देण्याचे आवाहन केले असून बँकेचे सरव्यवस्थापक राजीव गाढवे व राजेंद्र भिलारे यांनी बँकेने कमी केलेल्या व्याजदराचा तसेच व्याज अनुदान व भांडवली अनुदानाचा फायदा घेण्यासाठी थेट कर्जाचा तसेच इतर आर्थिक संस्थामधील वाढीव व्याजदराची कर्ज टेकओव्हर सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

याबद्दल बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, मार्गदर्शक संचालक आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील तसेच बँकेच्या सर्व संचालक महोदय यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT