Water Shortage
Water Shortage  Agrowon
ताज्या बातम्या

Water Shortage : मुबलक पाणी असतानाही सासवडकर तहानलेलेच

Team Agrowon

Pune News : सासवड (ता. पुरंदर) शहरास उन्हाळ्याच्या झळा बसतानाच वीज गायब होण्याच्या अवकाळी धक्क्याने पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. त्यातून नागरिकांच्या भावना संतप्त आहेत.

सासवड शहरास नित्यदिनी वीर धरणाच्या उद्भवातून ५० ते ६० लाख लिटर पाणी उपसा सिंचन पद्धतीने दोन ठिकाणच्या पंपिंगने मिळते.

गराडे जलाशयातून रोज सायपन पद्धतीने २५ लाख लिटर पाणी मिळते. सिद्धेश्वर उद्भवातून १० लाख लिटर पाणी मिळते. घोरवडी पाटबंधारे जलाशयातून १० लाख लिटर पाणी मिळते.

शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होतो. तरीही दरदिवशी ८० लाख लिटर पाणी शहराला लागते. परंतु, सिद्धेश्वर उद्भवाचे पाणी जानेवारीअखेरच पूर्णतः बंद झाले व गराडे जलाशयाचे पाणी कमी-कमी होत गेली आणि २० दिवसांपूर्वीही तेही पूर्णतः बंद झाले. आता फक्त घोरवडी जलायाचे दहा लाख लिटर पाणी गेल्या चोवीस तासात मिळाले.

वीर धरणाचे पाणी मंगळवारी (ता.९) सकाळी दहा वाजल्यापासून सलग २५ तास वीज नसल्याने व पुन्हा बुधवारी (ता. १०) दुपारी साडेतीनपासून धरणावरील वीज गेल्याने पाणी पुरवठा सुरु झालेला बंद झाला.

त्यामुळे शहरात मंगळवारपासून नळाद्वारे होणारा घरगुती, व्यावसायिक साराच पाणी पुरवठा बंद पडला आहे, असे सासवड नगरपालिकेचे पाणी पुरवठा अभियंता रामानंद कळस्कर यांनी सांगितले.

दरम्यान, उन्हाळा तीव्र असल्याने व पाणी नेमके कोणत्या दिवशी कोणत्या भागात येणार, हेसुद्धा वेळापत्रक कोलमडल्याने नागरिकांच्या भावना संतप्त आहेत.

दरम्यान, गुरुवारी (ता. ११) आगामी पालखीपूर्वी करावयाच्या वीज वितरणच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी जवळपास पुरंदर तालुक्यातील वीज पुरवठा सकाळी ८ ते सायंकाळी ६ दरम्यान बंद राहणार असल्याचे समजते. त्यामुळे सासवड शहराच्या विस्कळित पाणी पुरवठ्यात पुन्हा पाणी कपात होणार आहे.

त्यामुळे राहिलेल्या अति मोठ्या भागाचे पाणी पुरवठा वेळापत्रक पुन्हा पुढे जाऊ शकते, असे कळस्कर यांनी बजावले. त्यातूनच बुधवारी दिवसभर शहरात दवंडी देऊन पाणी जपून वापरा, पाणी येणार नाही किंवा पाणी येण्यास विलंब लागण्याबाबत नागरीकांना खबरदार केले.

मी कालपासून पाणी येण्याची वाट पाहतोय. काल व आजही ते आले नाही. जे व्यावसायिक, नोकरदार आहेत, ज्यांचे दिवसभर घरी कोणी नसेल, निश्चित पाणी कधी येणार, हे माहिती नसेल, त्यांचे विस्कळित पाणी पुरवठ्याने हाल होताहेत. हे मी लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाच्या कानावर घातले. लवकर सुधारणा व्हावी. यापुढे अधिक दक्षता घ्यावी.
- महेश नांदे, रहिवासी, सासवड
माझ्याकडे सोपाननगर भागात घरी विंधनविहीर (बोअर) आहे. कोणत्याही नागरिकास पाणी लागले; तर मोटर सुरु करून पाणी देण्यास घरातील पत्नी, सुना यांना बजावले आहे. या पद्धतीने इतर लोकांनीही शेजारधर्म टंचाईकाळात करावा.
- सुनीलकाका जगताप, बांधकाम व्यावसायिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT