Sanjay Raut Rahul Kul Agrowon
ताज्या बातम्या

Sanjay Raut : भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटींचा गैरव्यवहार? ; संजय राऊतांचा राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप

केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून केंद्रातील सरकार विरोधीपक्षाच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमीरा लावत असल्याचा आरोप सातत्याने विरोधीपक्षांकडून केला जात आहे.

Team Agrowon

Bhima-Patas Cooperative Sugar Mill News गेल्या काही वर्षात राज्यासह देशभरात भाजप विरोधीपक्षांच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाया (ED Action) होत आहेत. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्यावर ५०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. यासंदर्भात राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांना पत्र लिहिले आहे. तसेच या प्रकरणी चौकशीची मागणीही केली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून केंद्रातील सरकार विरोधीपक्षाच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमीरा लावत असल्याचा आरोप सातत्याने विरोधीपक्षांकडून केला जात आहे. अशातच आता राऊत यांनी भाजप आमदार कुल यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराबाबतचे फडणवीस यांना लिहिलेले पत्र ट्विट केले आहे.

''मा. देवेंद्र जी भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आपल्याकडे पाठवीत आहे. शेतकरी लुटला गेलाय हे स्पष्ट दिसते. हा ५०० कोटीचा मनी लाँड्रींग व्यवहार आहे. या प्रकरणाची निःपक्ष चौकशीची आपल्याकडून अपेक्षा आहे.'' असे राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

राऊत यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची यादीही ट्विट केली आहे. यात राऊत म्हणतात. "आपल्या माहितीसाठी भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ पाठवीत आहे. PMLA कायद्याने कारवाई व्हावी, असे घोटाळे संचालक मंडळाने केले आहेत व राजकीय वरदहस्त लाभला असल्याने ते बिनधास्त आहेत. शेतकऱ्यांच्या फसवणुकीस सरकारी पाठींबा आहे का?" असा सवाल राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

या आरोपांनंतर दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना आपण किरीट सोमय्या यांना या घोटाळ्याची कागदपत्रे चार वेळा पाठविल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी या घोटाळ्याची तक्रार करण्यास नकार दिल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केलेल्या एका आक्षेपार्ह विधानासंदर्भात राऊत यांना हक्कभंगाची नोटीस देण्यात आली आहे. याप्रकरणी गठीत करण्यात आलेल्या हक्कभंग समितीचे राहुल कुल हे अध्यक्ष आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Crop Loss: परभणीत दोन लाख हेक्टरवरील कपाशीला फटका

Onion Farmers: शिरूर तालुक्यात कांदा रोपे धोक्यात

Agriculture Damage: उरली सुरली पिकेही उद्ध्वस्त

Aster Flower Farming: ॲस्टरकडे शेतकऱ्यांची पाठ

Ethanol Export: अनुदानासह इथेनॉलच्या निर्यातीला परवानगी द्या

SCROLL FOR NEXT