Kharif Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात खरिपाचा अवघा ४ टक्के पेरा

Kharif season : जिल्ह्यात गतवर्षी जूनच्या मध्यावर खरिपाचा २३ टक्के इतका पेरा झाला होता. मात्र, जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवली आहे.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Kharif Crop Sowing : सांगली ः जिल्ह्यात गतवर्षी जूनच्या मध्यावर खरिपाचा २३ टक्के इतका पेरा झाला होता. मात्र, जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. याचा फटका खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीवर झाला आहे.

यंदा अवघी ४ टक्के म्हणजे १० हजार ६३१ हेक्टवर पेरणी झाली आहे. धूळ वाफेवर झालेले भात पीकही अडचणीत आले आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदीचे नियोजनही लांबणीवर टाकले आहे.

यंदा खरिपाचे सरासरी क्षेत्र २ लाख ५५ हजार ९८४ हेक्टर आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरिपाची पूर्ण तयारी केली आहे. मुळात, शिराळा तालुक्यात धूळ वाफेवर भात पेरणीसाठी शेतकरी पुढाकार घेतात.

यंदाच्या हंगामात शिराळा तालुक्यात १० हजार ५१ हेक्टरवर भाताची पेरणी उरकली आहे. परंतु पावसाअभावी भात पीकही संकटात सापडले आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

वेळेत पाऊस सुरू झाला नाही तर भात पिकाची दुबार पेरणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भात पीक जगवण्यासाठी शेतकरी धडपड करत असल्याचे चित्र आहे.

गेल्यावर्षी खरिपाचे सरासरी क्षेत्र २ लाख ९४ हजार ९७८ हेक्टर क्षेत्र होते. गतवर्षी मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात पेरणीयुक्त पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरण्या केल्या होत्या.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ६८ हजार ४१६ हेक्टर म्हणजे २३ टक्के पेरणी झाली होती. यामध्ये भात, सोयाबीन, तूर, मूग, उडीद यासह अन्य पिके होती.


मात्र, यंदा मॉन्सूनपूर्व पावसाने दडी मारली. जून महिना निम्मा झाला तरी, मॉन्सूनचा पाऊस सुरू झाला नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात अवघ्या भाताची पेरणी झाली आहे. सोयाबीनचा ३५८ हेक्टर आणि भुईमुगाचा २२ हेक्टर पेरा झाला आहे. पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांनी बियाणे आणि खते खरेदीचे नियोजनही लांबणीवर टाकले आहे.

कीटकनाशके, बियाणे विक्री करणारी दुकाने ओस
जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते अगोदर खरेदी करून ठेवतात. पाऊस झाल्यानंतर पेरणीला सुरुवात होते.

परंतु पावसाने दडी मारल्याने शेतकरी बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठीही पुढे आले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्र ओस पडली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT