Salam Kisan Agrowon
ताज्या बातम्या

Salam Kisan: शेतीतल्या सर्व अडचणींसाठी ‘सलाम किसान'ची सेवा

या सुपर ॲपच्या माध्यमातून शेती मूल्यसाखळीतील सर्व घटकांना ‘एन्ड टू एन्ड सोल्युशन' पुरवले जाईल, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

Team Agrowon

शेतकऱ्यांच्या सर्व अडचणींवर एककेंद्री उपाय म्हणून ‘सलाम किसान' हे सुपर ॲप (Salam Kisan Super App) विकसित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान (Agriculture Modern Technology) आणि सेवांचा पुरवठा करून त्यांना सक्षम करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. या सुपर ॲपच्या माध्यमातून शेती मूल्यसाखळीतील सर्व घटकांना ‘एन्ड टू एन्ड सोल्युशन' पुरवले जाईल, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

‘सलाम किसान'च्या माध्यमातून शेतकऱ्यानी प्रगत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच विविध उत्पादने आणि सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शेतीतील उत्पादनखर्च कमी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा उद्देश त्यामागे आहे.

शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांच्या (बियाणे, खते, किटकनाशके, बुरशीनाशके इ.) पुरवठ्यापासून ते त्यांच्या शेतीमालाच्या विक्रीव्यवस्थेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ‘सलाम किसान'ची सेवा उपलब्ध असेल. शेतीमालाच्या पुरवठा मूल्यसाखळीमध्ये शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच शेतीमध्ये येणाऱ्या निरनिराळ्या अडचणींवर मात करण्यासाठी मदत करणे, युवकांना रोजगाराच्या संधी मिळवून देणे, महिला वर्गाला सक्षम करून त्यांच्या उन्नतीसाठी हातभार लावणे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे असा सर्वंकष दृष्टिकोन ठेऊन ‘सलाम किसान' या सुपरॲपची उभारणी केली जात आहे.

‘सलाम किसान'कडून पुरवल्या जाणाऱ्या सेवाः

पीक दिनदर्शिका

कृषी निविष्ठा मार्केट लिंकेज

शेतीमाल विक्री व्यवस्थापन, मार्केट लिंकेज

शेतीमालाचे बाजारभाव

हवामान अंदाज

शीतगृह, गोदामे

विमा

आर्थिक साहाय्य

कृत्रिम बुध्दिमत्ता, मशिन लर्निंगचा वापर करून विकसित केलेले तंत्रज्ञान

९० सेकंदांत माती परीक्षण

सात ते आठ मिनिटांत ड्रोनच्या साहाय्याने फवारणी

Prym Solutions Private Limited या कंपनीच्या वतीने ‘सलाम किसान' हे सुपरॲप विकसित केले जात आहे. ‘‘सलाम किसानच्या या सर्व सेवांमुळे शेतकऱ्यांना थेट फायदा होईल. त्यांची शेती किफायतशीर करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. भविष्यातील तंत्रज्ञान आधारित शेती व्यवसायाला अपेक्षित असणारी ‘इकोसिस्टिम' उभारण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे,'' असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. धनश्री मानधनी या कंपनीच्या संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक आहेत. प्रद्युम्न मानधनी हे कंपनीचे संचालक आहेत तर अक्षय खोब्रागडे हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Girna River : गिरणा परिसरातील सर्वच बंधारे तुडुंब

Wildlife Crop Damage : पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी शासन सकारात्मक

MahaDBT : ‘महाडीबीटी’ पोर्टलवर कागदपत्रे अपलोडसह अनेक अडचणी

Book Review: ध्यासपंथी वाटचालींचा कोलाज

Rural Development: शेतकरी, ग्रामीण विकास आणि पर्यावरणाचा एकत्र विचार व्हावा

SCROLL FOR NEXT