Salam Kisan Agrowon
ताज्या बातम्या

Salam Kisan: सलाम किसान समूहाचे तंत्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेलः नितीन गडकरी

सलाम किसान समूहाचे डेटा ड्रिव्हन टेक्नॉलॉजीवर आधारित कमी खर्चात जास्त उत्पन्नाचे तंत्र शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (ता. १५) नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.

Team Agrowon

Nagpur News : सलाम किसान (Salam Kisan Group) समूहाचे डेटा ड्रिव्हन टेक्नॉलॉजीवर आधारित कमी खर्चात जास्त उत्पन्नाचे तंत्र शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शनिवारी (ता. १५) नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला. त्यांनी सलाम किसान समुहाच्या डिजिटल कृषी प्रधान भारत या संकल्पनेचे कौतुक केले.

आधार संस्था, नागपूर आणि वेस्टर्न कोलफिल्ड लि. यांनी संयुक्तपणे शनिवारी नि: शुल्क इंग्लैंड निर्मित हायटेक स्टिलटेक्चर प्रोस्थेसिस कृत्रिम पाय वितरण सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. आधार संस्थेचे अध्यक्ष सुमित गुलाबराव काटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. धनवटे नॅशनल कॉलेजच्या मातोश्री विमलाबाई देशमुख हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

त्यावेळी कार्यक्रम स्थळी सलाम किसान समूहाने शेतकऱ्यांसाठी ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक व ९० सेकंदात माती परीक्षण प्रात्यक्षिक करून दाखवले.

याप्रसंगी `सलाम किसान`चे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय खोब्रागडे यांनी श्री. गडकरी यांना कंपनीच्या सेवा व उत्पादनांची माहिती दिली.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर उपस्थित होते. तसेच धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्राचार्या भारती खापेकर, क्लिक टु क्लाऊडचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत मिश्रा, आकाश कीर्तने, रवी बलकी,निलेश शाहु, लोकेश कामडी, प्रफुल पौनीकर, प्रकाश कापडे, राहुल लेकुळवाले, इंडोलाईटचे डाॅ. धनंजय कांबळे यांची विशेष उपस्थिती होती. डॉ. अश्विनी कीर्तने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT