Cotton Broker Association Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Broker Association : ‘महाराष्ट्र कॉटन ब्रोकर्स’च्या अध्यक्षपदी सचिन शर्मा

Cotton industry : ‘महाराष्ट्र कॉटन ब्रोकर्स असोसिएशन’ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. १८) येथे झाली. यामध्ये २०२३-२४ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.

Team Agrowon

Akola News : ‘महाराष्ट्र कॉटन ब्रोकर्स असोसिएशन’ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. १८) येथे झाली. यामध्ये २०२३-२४ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी सचिनकुमार शर्मा यांची, तर सचिवपदी राहुल भरतवाल यांची निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष श्री. शर्मा (अकोला), उपाध्यक्ष गोपाल पुरोहित (यवतमाळ), सचिव श्री. भरतवाल (नागपूर), कोशाध्यक्ष विक्रम खेतान (अकोला) व निरंजन अग्रवाल (अकोला), सहसचिव विकास तिवारी (अकोला) आणि कार्यकारिणी सदस्यांमध्ये देवीसिंग शेखावत (वर्धा),

अजय अग्रवाल (नागपूर), कैलास शर्मा (नांदेड), राजेश दासानी (अमरावती), अनिल चोखानी (यवतमाळ), विशाल पुरोहित (नागपूर), कपिल नेवटिया (जालना), संतोष राठी व राजेश मुंदडा (अकोला) आणि रवींद्र शर्मा (औरंगाबाद),

ज्येष्ठ सदस्य म्हणून नंदकिशोर अग्रवाल, नट्टुभाई ठक्कर आणि अरुणकुमार खेतान यांचा समावेश करण्यात आला आहे. श्री. शर्मा यांची अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी चंद्रमोहन मोहता होते.

वर्धा येथे घेणार अधिवेशन

सभेच्या सुरुवातीला मागील सर्वसाधारण सभेच्या कार्यवाहीला मान्यता देण्यात आली. तसेच हिशेबाला स्वीकृती प्रदान करण्यात आली. हिशेब परीक्षकाची नियुक्ती केल्या गेली. तसेच ‘असोसिएशन’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कापूस अधिवेशन वर्धा येथे घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. २०२२-२३ मध्ये देशात तीन कोटी २९ लाख कापूस गाठी निर्मितीची शक्यता आहे. तर दोन कोटी ७८ लाख गाठी १८ मेपर्यंत बांधण्यात आल्या आहेत, अशी माहिती श्री. शर्मा यांनी या वेळी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT