Team Agrowon
जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यात १० हजार गाठींपेक्षा कमी आवक होती. सध्या ५० ते ५५ हजार गाठींच्या दरम्यान आवक होत आहे.
सध्याही कापसाची आवक सरासरीपेक्षा ४ ते ५ पटींनी जास्तच आहे.महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये कापूस आवक जास्त आहे.
इतर राज्यातील आवक सरासरीऐवढी होत आहे.देशातून यंदा सूत आणि कापड निर्यात कमी झाली. याचा दबाव कापूस बाजारावर येत आहे.
कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपये भाव मिळाला. कापसाला कमाल भाव काही बाजारांमध्ये ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान पोचला.
कापसाचे वायदे सोमवारी खंडीमागे १८० रुपयांनी नरमले होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत कापूस वायद्यांनी ५६ हजार ९६० रुपयांचा टप्पा गाठला.
देशातील बाजारात आजही ५० हजार गाठींच्या दरम्यान कापूस आला होता.कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते.
कापूस उत्पादक भागात इतर पिकांचा पर्याय कमी असतो. त्यामुळे लागवड कायम राहू शकते.