River Flood Agrowon
ताज्या बातम्या

Natural Calamity : अनेक नैसर्गिक, कृत्रिम कारणांनी नद्यांना पूर

महाराष्ट्रात राबविलेल्या ‘चला, नदीला जाणून घेऊ या,’ या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला. या उपक्रमात सुरवातीला ७५ नद्या घेतल्या होत्या.

Team Agrowon

कोल्हापूर : नद्यांना पूर (River Flood) येण्यामागे अनेक नैसर्गिक व कृत्रिम कारणे आहेत. तो नियंत्रित आणण्याच्या प्रक्रियेला वेळ लागेल.

तथापि, प्रदूषणाच्या (Pollution) अनुषंगाने विविध कृती कार्यक्रम राबवून ते एक ते तीन वर्षांत निश्चितपणाने आटोक्यात आणता येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा (Dr. Rajendra Singh Rana) यांनी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग आणि असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पंचगंगा- पूर आणि प्रदूषण’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, महाराष्ट्रात राबविलेल्या ‘चला, नदीला जाणून घेऊ या,’ या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला. या उपक्रमात सुरवातीला ७५ नद्या घेतल्या होत्या.

ही संख्या १०८ पर्यंत गेली. त्यातून राज्यातील अनेक नद्या अत्यवस्थ असल्याचे वास्तव सामोरे आले. पंचगंगा त्यापैकी एक आहे. शंभर वर्षांपूर्वीपर्यंत नद्या प्रदूषित न होऊ देण्याची जबाबदारी सज्जन साधुसंतांनी घेतली होती.

आता मात्र विद्येच्या क्षेत्राने त्यासाठी पुढाकार घेऊन काम करण्याची गरज आहे. महापूर रोखण्यासाठी पावसाच्या अगदी पहिल्या थेंबापासून प्रयत्न करावे लागतील. ते वेळखाऊ आहे. मात्र, प्रदूषण मात्र आपण आपल्या काही वाईट सवयींना आळा घालून रोखू शकतो.

त्रिस्तरीय समितींच्या अनुषंगाने कुलगुरू डॉ. शिर्के यांनी संशोधन संकलनासाठी पर्यावरणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आसावरी जाधव, सामग्री विश्लेषणासाठी तंत्रज्ञान अधिविभागातील डॉ. पी. डी. पाटील आणि निष्कर्ष समितीमध्ये डॉ. जी. एस. कुलकर्णी, डॉ. सचिन पन्हाळकर आणि डॉ. प्रकाश राऊत यांची नावे जाहीर केली.

प्रा-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, आर्किटेक्ट असोसिएशनचे सचिव राज डोंगळे उपस्थित होते. असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तंत्रज्ञान अधिविभाग संचालक डॉ. एस. एन. सपली यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : दिवाळीच्या सणावर संकटाचे ढग

Farmer Relief : पूर्व विदर्भामध्ये ५६ हजारावर शेतकऱ्यांना मदतनिधीची प्रतीक्षाच

Sugar MSP : केंद्राने साखरेची किमान विक्री किंमत ४३०० रुपये करावी

Paddy Harvesting : भुदरगडमध्ये भात कापणीला वेग

Tiger Terror : वाघाच्या दहशतीने शेतीकामेच रखडली

SCROLL FOR NEXT