Nadi Sanvad Yatra  Agrowon
ताज्या बातम्या

Nadi Sanvad Yatra : नदी संवाद यात्रा लोकचळवळ व्हावी: जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

‘चला जाणूया नदीला’ अभियान जिल्हास्तरीय समितीची बैठक

Team Agrowon

सोलापूर ः ‘चला जाणूया नदीला’ अभियानामध्ये जिल्ह्यातील कासाळगंगा, भीमा, कोरडा, आदिला, दुबदुबी आणि माणगंगा नद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या अभियानांतर्गत ‘नदी संवाद यात्रे’चे आठवडाभरात नियोजन करावे. या यात्रेसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद केली जाईल. ही नदी यात्रा आशयपूर्ण, प्रभावी आणि लोकसहभागाची चळवळ होण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी आराखडा करून अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.

नियोजन भवन येथे आयोजित ‘चला जाणूया नदीला’ अभियानासंदर्भात जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सहायक जिल्हाधिकारी मनिषा ओव्हाळे, उपवनसंरक्षक तथा समितीचे सदस्य सचिव धैर्यशील पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) चारूशीला देशमुख - मोहिते, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह समितीचे सदस्य व नदीप्रहरी सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, गेल्या काही वर्षांत पूर किंवा दुष्काळ यासारख्या समस्या वारंवार जाणवत आहेत. या पार्श्वभूमीवर नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्याची सोडवणूक करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह नद्यांचा व्हावा अभ्यास हे अभियान राबविताना प्रथम नदी प्रदूषणाची कारणे, त्याचा अभ्यास, समस्या, उपचार व निदान अशा टप्पे आहेत. तहसीलदार यांनी गटविकास अधिकारी व नदीप्रहरी सदस्य यांची बैठक घ्यावी. या अभियानात लोकसहभाग असणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्तीत जास्त जनजागृती होणे आवश्यक असून, त्यासाठी शिक्षण विभागाने विद्यापीठाच्या सहकार्याने विविध स्पर्धांचे आयोजन करावे. नोडल अधिकारी व समन्वयक यांनी सर्व संबंधित विभागांशी नियमित संपर्क ठेवावा, असेही शंभरकर म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Availability: मुबलक चाऱ्यामुळे पशुपालकांची चिंता मिटली

Agro Input Dealers Association: दोषांची जबाबदारी उत्पादकांवर असावी: ‘ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन

Revenue Department Structure: महसूल विभागाचा आकृतिबंध निश्‍चित

Sugarcane Workers Migration: हंगाम आटोपल्याने ऊसतोड कामगार परतीच्या मार्गावर

Pune Crop Damage: हाती आलेले पीक गारपिटीने मातीमोल

SCROLL FOR NEXT