Rain Update
Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain : मध्य प्रदेश, गुजरातेत नद्यांची पातळी वाढली

टीम ॲग्रोवन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात काही भागांत मुसळधार पाऊस (Heavy Rain In Madhy Pradesh) पडत असून गेल्या चोवीस तासांत नर्मदा (Narmada River), बेतवा आणि ताप्ती नद्या धोक्याच्या पातळीपर्यंत (Water Level Of River In Madhy Pradesh) पोहोचल्या. धार येथे बांधकामस्थितीतील असलेल्या धरणाची भिंत पावसामुळे ढासळली. त्यामुळे परिसरातील ११ गावे रिकामी करण्यात आली आहेत. गुजरातमध्ये तापी नदीची पातळी (Tapi River Water Level) वाढली असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. त्याचवेळी छत्तीसगड येथे पावसामुळे पिके पाण्याखाली गेली आहेत.

मध्य प्रदेशातील ओंकारेश्‍वर-हलाली धरण ओसंडून वाहत आहे. तवा आणि इंदिरासागर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. नर्मदापुरम, खंडवा, बैतुल, रायसेन, हरदा, धारच्या अनेक भागांत नर्मदा नदीदेखील दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. रामघाट येथे शिप्रा नदीच्या किनाऱ्यावर उभारलेले मंदिर पाण्यात गेले आहे. धार येथे भरूडपुरा आणि कोठीदादरम्यान कारम नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणातून विसर्ग वाढत चालला आहे. शुक्रवारी (ता. १२) सकाळी मातीपासून तयार केलेल्या धरणाची भिंत ढासळली. बऱ्हाणपूर येथे ताप्ती नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. येत्या चार दिवसांत राज्यांत चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.

तापी नदीची पातळी वाढली

गुजरातच्या सुरत येथे उकाई धरणातून पाणी सोडल्याने तापी नदीची पातळी वाढू लागली आहे. नदीकाठावरील अडाजण येथील रेवानगरच्या झोपड्या पाण्याखाली गेल्या. त्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या भागातील ४५ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.

छत्तीसगड येथे मुसळधार पाऊस

छत्तीसगड येथे दोन दिवस मुसळधार पाऊस पडला. या महिन्यांत आतापर्यंत १८३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. हे प्रमाण सरासरीपेक्षा २९ टक्के अधिक आहे. नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे. धान शेती खराब होत आहे. शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. काही ठिकाणी पूल वाहून गेले आहेत. अलीकडेच तयार केलेले रस्तेदेखील सततच्या पावसाने खचले आहेत.

हिमाचलमध्ये भूस्खलनाचे प्रमाण वाढले

गेल्या दोन तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने शुक्रवारी (ता. १२) विश्रांती घेतली. ओलावा राहिल्याने माती ढासळण्याचे आणि भूस्खलन होण्याचा धोका वाढला आहे. डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या ग्रामस्थांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ग्रामीण भागातील अनेक रस्ते वाहून गेल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT