Grampanchyat Election
Grampanchyat Election  Agrowon
ताज्या बातम्या

Grampanchyat Election : ग्रामपंचायत, ‘सहकारी’च्या नवीन सदस्यांना मताधिकार

Team Agrowon

अमरावती : राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी (Market Committee Election) नवीन मतदारांची नावे मतदार यादीत (Grampanchyat Election ) समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नामनिर्देशनाच्या पाच दिवस अगोदरपर्यंत नवीन सदस्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी सुधारणा करणारी अधिसूचना जारी केली आहे.

या अधिसूचनेमुळे नव्याने निवडून आलेल्या कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायतीच्या सदस्यांना नवीन मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे.

बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी राज्य सहकारी प्राधिकरणाने जाहीर केलेल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार मतदार यादीत जुन्याच सदस्यांची नावे होती.

दरम्यान, ग्रामपंचायत व सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या. काही सेवा सहकारी संस्थांच्या निवडणूका अजूनही होत आहेत.

नव्याने निवडून आलेल्या व येणाऱ्या सदस्यांना बाजार समितीच्या मतदारयादीत स्थान मिळाले नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या.

त्यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने सुधारणा करणारी अधिसूचना काढली आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत व सेवा सहकारी संस्थांच्या नवीन निवडून आलेल्या सदस्यांना मतदार यादीत समाविष्ट करावे लागेल.

अमरावतीतील दहा बाजार समित्यांच्या निवडणुका प्रस्तावित

अमरावती जिल्ह्यातील अमरावती, मोर्शी, वरुड, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्‍वर या दहा बाजार समित्यांच्या निवडणुका प्रस्तावित आहेत.

या बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात ग्राम पंचायतीचे ५ हजार ६६६ सदस्य आहेत. सेवा सहकारी संस्थांचे १६,३१५ सदस्य आहेत. या सर्व बाजार समित्यांना आता नव्याने मतदार यादी तयार करावी लागेल. त्यासाठी ७० दिवसांचा कालावधी लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

Education Fund : रानमसलेच्या प्राथमिक शाळेसाठी ‘लक्ष्मी’कडून सव्वा कोटींचा निधी

Lake Conservation : जैवविविधतेच्या बळावर ‘त्या’ करतात तलावाचे संवर्धन

SCROLL FOR NEXT