Rice Farming Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Farming : ड्रम सीडर पेरणीतून पिकवला भात

तालुक्यातील सापोली पिंपळगावातील अनिल चंद्रकांत काणेकर यांच्या दीड एकर शेतात ड्रम सीडर पेरणी यंत्राच्या मदतीने भात लागवड केली.

Team Agrowon

पेण : तालुक्यातील सापोली पिंपळगावातील अनिल चंद्रकांत काणेकर यांच्या दीड एकर शेतात ड्रम सीडर पेरणी (Drum Seeder Sowing) यंत्राच्या मदतीने भात लागवड (Paddy Cultivation) केली. अल्‍प खर्चात चांगले उत्‍पादन (Paddy Production) झाल्‍याने शेतात सोने पिकवल्‍याचे प्रतिक्रिया पेण तालुका कृषी सहायक व्ही. एस. लाडगे यांनी व्यक्‍त केली.

राज्यातील विविध भागात आधुनिक पद्धतीची भात शेती करण्यात येत असल्‍याने पेण तालुक्यातही अशा पद्धतीने लागवड व्हावी, याकरिता सापोली पिंपळगाव येथील शेतकरी अनिल चंद्रकांत काणेकर यांच्याशी संपर्क करून ड्रम सीडर पेरणी यंत्राची माहिती देत आधुनिक पद्धतीने भात लागवड केली.

त्‍यासाठी दीड एकर भात शेतीमध्ये कर्जत ९ हे भाताचे वाण देण्यात आले. त्‍याआधी भाताला कीटकनाशक औषध (थायरम) लावून (जैविक अझोटो फॅक्टर) बीज प्रक्रिया करून लागवड केली. शेतीमध्ये गवत वाढू नये याकरिता औषधाची फवारणी करण्यात केल्‍याचे लांडगे यांनी सांगितले.

तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. त्याचा योग्‍य उपयोग केल्‍यास येणाऱ्या काळात भात शेती ओसाड न होता दर्जेदार पिकांनी घर, शिवार समृद्ध होईल. त्‍यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करावा.

- संभाजी पोटे, कृषी पर्यवेक्षक, पेण

भात शेतीसाठी आधी मोठ्या प्रमाणावर खर्च व्हायचा. त्‍या तुलनेत उत्‍पादन मात्र कमी व्हायचे. मात्र शासनाच्या नवनवीन योजनांनुसार यंदा पहिल्‍यांदाच आधुनिक पद्धतीने भात लागवड केली.

- अनिल काणेकर, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT