Rise in rice prices 
ताज्या बातम्या

Rice Festival : जिल्हा परिषदेत आज ‘तांदूळ महोत्सव’

या महोत्सवात जिल्ह्यातील वेल्हा, मुळशी, मावळ, आंबेगाव, भोर, हवेली, खेड, पुरंदर व जुन्नर या तालुक्यांतील महिला स्वयंसाह्यता समूह सहभागी होणार आहेत.

टीम ॲग्रोवन

पुणे : ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद पुणेमार्फत आज (ता. १२) तांदूळ महोत्सव (Rice Festival) नवीन जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

या महोत्सवात जिल्ह्यातील वेल्हा, मुळशी, मावळ, आंबेगाव, भोर, हवेली, खेड, पुरंदर व जुन्नर या तालुक्यांतील महिला स्वयंसाह्यता समूह सहभागी होणार आहेत. यामध्ये पुणेकरांना अस्सल इंद्रायणी सेंद्रिय तांदूळ आणि त्याचबरोबर कोलम, वाडा कोलम, आंबेमोहर, काळा तांदूळ, बासमती स्थानिक वाणाचा दप्तरी आदी विविध प्रकारचा तांदूळ खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहेत.

सर्व पुणेकर नागरिक तसेच सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी तांदूळ महोत्सवास भरघोस प्रतिसाद देत खेरदी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: तुटलेल्या उसाला प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारखान्यांकडे मागणी

FFS Fertilizer Booking System: खत ‘ऑनलाइन बुकिंग’ला नऊ जिल्ह्यांमध्ये सुरुवात

Farm Loan Waiver Lists: दर पंधरा दिवसांनी कर्जमाफीच्या याद्या येणार: मुख्यमंत्री फडणवीस

Wheat Export Ban Lifts: केंद्र सरकारने गहू निर्यातीवरील बंदी उठविली

Pune Rain: घाटमाथ्यावर तुरळक सरी

SCROLL FOR NEXT