Cotton Market  Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Market : कापसाचे भाव आणखी वाढतील का?; भावात ७०० रुपयांपर्यंत सुधारणा

Cotton Bazar Bhav : देशातील बाजारात मागील दोन आठवड्यांमध्ये कापूस दरात चांगली वाढ झाली. कापसाच्या भावाने प्रतिक्विंटल सरासरी ५०० ते ७०० रुपयांनी उभारी घेतली. कापसाचे भाव वाढले तरी आयात खूपच कमी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

Team Agrowon

Cotton News : कापूस बाजारात मागील १५ दिवसांमध्ये चांगली सुधारणा झाली. देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या दरात वाढ झाली. देशातील वायद्यांमध्येही चांगलीच वाढ झाली. कापूस वायदे ६० हजार ५०० रुपयांवर पोचले. तर बाजार समित्यांमध्येही भाव ५०० ते ७०० रुपयांनी वाढले आहेत.

देशातील बाजारात मागील दोन आठवड्यांमध्ये कापूस दरात चांगली वाढ झाली. कापसाच्या भावाने प्रतिक्विंटल सरासरी ५०० ते ७०० रुपयांनी उभारी घेतली. कापसाचे भाव वाढले तरी आयात खूपच कमी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कारण बहुतांशी शेतकऱ्यांनी कापूस विकला. शेतकऱ्यांकडे केवळ ५ टक्के कापूस असू शकतो, असं शेतकरी सांगतात. ऑगस्ट महिन्यात भाव वाढतात, असे ट्रेंड मागील अनेक वर्षांपासून दिसतो. पण पावसामुळे शेतकरी जास्त दिवस कापूस ठेवत नाहीत. यंदा जूनपर्यंत कापूस आवक ४० हजार गाठींच्या दरम्यान होती. पण सध्या आवक निम्माने कमी दिसते.

बाजारातील कापूस आवकेचा विचार करता, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ३ हजार गाठींच्या दरम्यान आवक होत असते. पण यंदाची आवक १५ हजार गाठींच्या दरम्यान असल्याचे व्यापारी सांगत आहेत. मे महिन्यानंतर बाजारातील कापूस आवक कमी होत गेली. पण सरासरीच्या तुलनेत कापूस आवक जास्त आहे. त्यातच कापसाला उठाव नसल्याचे सांगत जुलै महिन्यापर्यंत कापसाचे भाव सरासरी ७ हजारांच्या कमी होते. पण ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच कापसाच्या भावात वाढ होत गेली.

कापूस भाव केवळ देशाच वाढले नाहीत तर आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या भावात वाढ झाली. कापूस वायद्यांमध्ये चालू आठवड्यात चांगली उभारी दिसली. इंटरकाॅन्टीनेन्टल एक्सचेंजवर कापसाच्या वायद्यांमध्ये शुक्रवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दोन टक्क्यांनी वाढ झाली होती. कापूस वायदे ८७.८३ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. कापसाच्या भावात चढ उतारही होत आहेत. सोमवारी हा भाव टिकून राहील्यास देशातील भावही वाढीस मदत होईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील वायद्यांनीही शुक्रवारी ६० हजारांचा टप्पा पार केला होता. शुक्रवारी कापूस वायदे ६० हजार ५०० रुपयांवर बंद झाले होते. तर बाजार समित्यांमधील भाव ६ हजार ७०० ते ७ हजार ८०० रपयांच्या दरम्यान होते. कापूस भावात ऑगस्ट महिन्यात किमान ५०० रुपयांची वाढ दिसू शकते, असा अंदाज महिन्याच्या सुरुवातीलाच दिला जात होता. तसेच हा भाव टिकून राहील, असेही जाणकारांनी होते.

कापसाला पुढील काळातही मागणी कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यातच आतापर्यंत कापूस लागवड एक टक्क्याने कमी राहण्याची शक्यता आहे. तर पाऊसमानही सरासरीपेक्षा कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला. कापूस हे जास्त दिलसांचे पीक आहे. यामुळे कापूस उत्पादकतेवर परिणाम होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. शिल्लक साठाही कमी राहू शकतो. यामुळे कापसाचे भाव आणखी वाढू शकतात, असाही अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT