Maharashtra Rainfall Deficit: बारामती तालुक्यात सप्टेंबर महिना सरत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा तालुक्यात केवळ ४.४ टक्के पाऊस झाला आहे. पावसाअभावी खरीप हंगामासह रब्बी हंगामही धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता परतीच्या पावसाची आशा लागून राहिली आहे..तालुक्यासह मोरगाव, मूर्टी, मासाळवाडी, आंबी बुद्रुक आदी गावांतील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. परतीचा पाऊस चांगला झाला तर खरिपातील पिकांना नवसंजीवनी मिळेल आणि रब्बी हंगामाच्या आशाही पल्लवित होतील. मात्र, पाऊस झाला नाही तर खरिपाबरोबरच रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे..Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा अंदाज; कोणत्या भागात जोर?.एक सप्टेंबर ते २१ सप्टेंबर यादरम्यान बारामती तालुक्यात ११ मंडलांमध्ये केवळ ७.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील भौगोलिक व नैसर्गिक परिस्थितीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात होतो. त्यावर शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम चांगला जातो. जून महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत पडलेल्या पावसाच्या चढउतारामुळे ‘कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती आहे, अशी माहिती बारामतीचे तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी दिली. .बारामती तालुक्यात बारामती, माळेगाव बुद्रुक, पणदरे, वडगाव निंबाळकर, लोणी भापकर, सुपा, मोरगाव, उंडवडी क.प., शिर्सुफळ, काटेवाडी, करंजेपूल या मंडलांत दरवर्षी सप्टेंबर महिन्यात सरासरी १८० मिलिमीटर पावसाची नोंद आहे. पावसाअभावी चारा पिके जगवणे व खरिपातील पीक काढणीपर्यंत तग धरतील असा पाणीपुरवठा करणे यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे, असे मासाळवाडीचे मुरलीधर ठोंबरे, मूर्टीचे बाळासाहेब जगदाळे आदी शेतकऱ्यांनी सांगितले..Monsoon Retreat: राजस्थानसह पंजाब, हरियानाच्या काही भागांतून मॉन्सूनची माघार.दृष्टिक्षेपात११ मंडलांत सप्टेंबरमध्ये सरासरी १८० मिलिमीटर पावसाची नोंदगतवर्षी अवकाळी व परतीच्या पावसामुळे खरीप व रब्बीमध्ये होता सुकाळयंदा अवकाळी पावसाबरोबर परतीच्या पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत.उंडवडी, मोरगावास टंचाईचे चटकेखरीप हंगामामध्ये २०२५-२६ या वर्षात शेतकऱ्यांनी बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, आडसाली ऊस, चारा पिके असे ३६ हजार ५६ हेक्टरवर पिकांचे उत्पादन घेतले आहे. खरीप हंगामात ३२३४६ हेक्टरचे उद्दिष्ट होते. उद्दिष्टापेक्षा उत्पादन क्षेत्र वाढले असून ११३ टक्के खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. उंडवडी व मोरगाव मंडळांमध्ये टंचाईचे चटके पिकांना बसू लागले आहेत..बारामतीचा जिरायत भाग पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे आजही ओढे, नाले, नदी, तलाव कोरडे आहेत. दुष्काळसदृश परिस्थिती निवारणासाठी सरकारने टंचाई निवारणमधून तलाव, ओढे पुरंदर उपसा सिंचन योजनेतून भरून द्यावेत. सध्या पाण्याच्या टंचाईमुळे भाजीपाला, चारा पिके, फुलशेती, खरीप हंगामातील पिकांसह आडसाली ऊस अडचणीत आला आहे.दत्तात्रेय ढोले, शेतकरी, मोरगाव.पिकांना जीवदान देण्यासाठी नैसर्गिक स्रोतांमध्ये पाण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना किमान एकावेळी तलाव व ओढे टंचाईमधून भरून द्यावेत.प्रवीण शिर्के, शेतकरी, आंबी बुद्रुक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.