Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : सांगलीतील पीक विम्याबाबत तक्रारी सोडवा

केंद्र सरकार सर्वसामान्यांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ प्रत्येक्ष लाभार्थीला व्हावा यासाठी या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.

Team Agrowon

सांगली ः जिल्‍ह्यात पीक विम्याबाबत (Crop Insurance) शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. याबाबत कृषी विभागाने (Agriculture Department) संबंधित विमा कंपनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना खासदार तथा जिल्हा विकास व समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिल्या.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाली.

महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दीपक चव्हाण यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते. खासदार संजय पाटील यांनी केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेतला.

खासदार पाटील म्हणाले, की केंद्र सरकार सर्वसामान्यांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ प्रत्येक्ष लाभार्थीला व्हावा यासाठी या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.

तसेच कृषीसाठी अनेक योजना आहेत. या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. एकही पात्र लाभार्थी शेतकरी कृषीच्या योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी योजनांच्या अंमलबजावणीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Smart Village: पारदर्शकतेतून शिवणखेड झाले स्मार्ट गाव

Farmer Relief: अवैध सावकारांनी बळकावलेली ३९.१२ हेक्टर जमीन केली परत

MGNREGA Scheme: ‘जी राम जी’मुळे राज्यावर आर्थिक भार

Ethanol Production: वर्षभरात सव्वाशे लाख टन मक्यापासून इथेनॉल निर्मिती

Tiger Conservation: राज्यातील साडेचारशे वाघांना ‘रेडिओ कॉलर’ लावणे अशक्य

SCROLL FOR NEXT