Farmer  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Research : संशोधनासाठी शेतकरी शास्त्रज्ञांत सुसंवाद हवा

आगामी काळात कृषी आणि पशुपालन क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान वाढविण्यासाठी निश्चित उपयोग होणार आहे.

Team Agrowon

परभणी ः आगामी काळात कृषी (Agriculture) आणि पशुपालन (Animal Rearing) क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे (Agriculture Technology) शेतकऱ्यांचे जीवनमान वाढविण्यासाठी निश्चित उपयोग होणार आहे. त्यासाठी शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांनी सुसंवाद साधत संशोधन करून त्यांचे निष्कर्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी केले.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त परभणी पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात बुधवारी (ता. ३०) कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर डॉ. इंद्र मणि यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. व्ही. देशमुख होते.

प्रास्ताविकात डॉ. देशमुख यांनी महाविद्यालयाच्या विविध कार्यक्रमांचा आढावा सादर केला. या वेळी डॉ. तात्यासाहेब रसाळ यांना महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार २०२१ प्राप्त झाल्याबद्दल कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संविधान दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन डॉ. सुनीत वानखेडे यांनी तर आभार डॉ. गोविंद गंगणे यांनी मानले. सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. अझीझ, डॉ. सिद्दिकी, डॉ.माणिक धुमाळ आदींसह प्राध्यापक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT