Ujani Canal Agrowon
ताज्या बातम्या

Ujani Canal : उजनी कालव्याची दुरुस्ती संथगतीने सुरू

नुकसानीचे पंचनामे झाले, अहवाल गेला पण अद्याप मदत नाही

Team Agrowon

मोहोळ, जि. सोलापूर ः उजनीचा कालवा (Ujanai Canal) फुटला, शेतकऱ्यांचे नुकसान झाले, नुकसानीचे पंचनामे झाले, पंचनाम्याचा अहवाल वरिष्ठांकडे गेला.

परंतु नुकसानभरपाई कधी व किती मिळणार याची शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, कालवा फुटून बारा दिवस झाले.

मात्र कालवा दुरुस्तीचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. कालवा दुरुस्त होणार कधी, पाण्याचे रोटेशन मिळणार कधी या प्रश्नाने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

कालवा दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पाटकूल (ता. मोहोळ) येथील शिवारातील कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विहिरी गाळाने भरल्या तर शेततळी वाहून गेली आहेत.

द्राक्ष, डाळिंब या फळबागांसह गहू, ऊस, मका यांच्यासह अन्य पिके पाण्यात गेली. ठिबक सिंचन संच वाहून गेले. प्रशासनाने याची दखल घेत पंचनामे केले.

वरिष्ठांना पाठवले सुद्धा आता नुकसान भरपाई किती व केव्हा मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

खरडून गेलेल्या जमिनीचे व ज्यांच्या शेतात माती वाहून आली या दोन्हीही जमिनींचे सपाटीकरण करणे तसेच गाळाने भरलेल्या विहिरीतील गाळ काढणे या दोन्ही समस्या शेतकऱ्यांसमोर उभा आहेत. हे मोठे खर्चिक काम आहे.

सध्या कालवा दुरुस्तीसाठी दोन पोकलेन व आठ हायवा टिपर कार्यरत आहेत. अशा एवढ्या यंत्रसामग्रीने काम सुरू ठेवले तर दुरुस्तीला मोठा वेळ लागणार आहे.

त्यासाठी मोठ्या यंत्रसामुग्रीची गरज आहे. या संदर्भात तुंगत येथील कालवा विभागाचे उपकार्यकारी अभियंता शिरीष जाधव यांच्याशी संवाद साधला असता, सध्या आठ हायवा टिपर आहेत. माती व खडक लांबून वाहून आणावी लागत आहे.

त्यासाठी आणखी १५ हायवाची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT