Government lands Agrowon
ताज्या बातम्या

Government lands : शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे काढा

जिल्ह्यामध्ये गायरानावर मोठ्या प्रमाणात निवासी, वाणिज्य, औद्योगिक, शेती व अन्य प्रयोजनार्थ नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. ती अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आदेश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले आहेत.

Team Agrowon

सातारा : जिल्ह्यामध्ये गायरानावर (Grazing Land) मोठ्या प्रमाणात निवासी, वाणिज्य, औद्योगिक, (Industrial) शेती व अन्य प्रयोजनार्थ नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. ती अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आदेश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले आहेत.

उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार अशी अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ५३ (२) अन्वये कोणत्याही गायरानावर किंवा कोणत्याही इतर जमिनीवर अनधिकृतपणे अडथळा किंवा अतिक्रमण, अनधिकृत लागवड केलेले कोणतेही पीक काढून टाकण्याचा अधिकार आहे.

त्यानुसार जयवंशी यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारची अतिक्रमणे ३१ डिसेंबरअखेर कायदेशीर तरतुदीचा अवलंब करून विहित पद्धतीने उद्घोषणा जाहीर झाल्यापासून दहा दिवसांच्या आत काढून घेण्यात यावीत. अन्यथा सदरची अतिक्रमणे शासकीय यंत्रणेद्वारे निष्कासित करण्यात येतील व सदर अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठीचा खर्च जमीन महसुलाची थकबाकी म्हणून संबंधितांकडून वसूल करण्यात येईल. ही अतिक्रमणे निष्कासित करण्याचे, कारवाईवर सनियंत्रण ठेवण्यासाठी व कारवाई मुदतीत होईल याबाबत सर्वतोपरी उपाययोजना व कारवाई करण्यासाठी तालुकास्तरीय समिती घोषित करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Crop Pest: तुरीवरील ‘ग्राफोलिटा’ अळी

Sustainable Development: शाश्वत विकासासाठी ‘रेन ट्री फाउंडेशन’चा पुढाकार

October Rainfall: ऑक्टोबर महिन्यात राज्यात १०५ टक्के पाऊस

Weekly Weather: बहुतांशी भागांत उघडिपीसह हलक्या पावसाच्या शक्यता

Agriculture Risk Management: ‘वनामकृवि’त स्थापन होणार शेतीतील जोखीम व्यवस्थापन केंद्र

SCROLL FOR NEXT