Agriculture  Agrowon
ताज्या बातम्या

America Agri Produce : अमेरिकेच्या काही कृषी उत्पादनांसाठी पायघड्या

Team Agrowon

Agriculture News : भारत आणि अमेरिका यांच्यात जागतिक व्यापार संघटनेत सुरू असलेल्या शेवटचा विवाद संपविण्यासाठी भारताने अमेरिकेच्या काही कृषी उत्पादनांसाठी दार खुले केले आहे.

भारताने अमेरिकेच्या फ्रोझन टर्की, फ्रोझन बदक, ताजी ब्लुबेरी आणि क्रेनबेरी, फ्रोजन ब्लुबेरी आणि क्रेनबेरी, वाळलेली ब्लुबेरी आणि क्रेनबेरी तसेच प्रक्रियायुक्त ब्लुबेरी आणि क्रेनबेरी आदी कृषी उत्पादनांच्या आयातीवरील शुल्कात कपात करण्याचे मान्य केले. भारताच्या या निर्णयाचे अमेरिकेचे सरकार, राजकारणी आणि शेतकऱ्यांनीही स्वागत केले

‘जी २०’ देशांच्या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारतात आले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बायडेन यांची ८ सप्टेंबर रोजी भेट झाली होती. या दोन नेत्यांच्या बैठकीनंतर एक निवेदन जारी करण्यात आले. या निवेदनात म्हटले होते, की भारत आणि अमेरिका या दोन देशांमधील जागतिक व्यापार संघटना अर्थात डब्ल्यूटीओमध्ये सुरू असलेला सातवा आणि शेवटचा विवाद या दोन्ही नेत्यांच्या परस्पर समंजस्यातून निकालात काढण्यात आला.

या साम्यंजस्य करारातून अमेरिकेच्या टर्की, बदक, क्रेनबेरी आणि ब्लुबेरीवरील आयातशुल्क कपात करण्याचे भारताने मान्य केले. मागील आठवड्यात अमेरिकेच्या विदेश व्यापार प्रतिनिधी कॅथरिन टाई यांनी अमेरिका आणि भारत हे दोन्ही देशांचे जागितक व्यापार संघटनेत असेल्या शेवटच्या विवादावर सामंजस्यातून तोडगा काढण्यावर एकमत झाल्याचे सांगितले होते.

या तोडग्यानुसार भारताने अमेरिकेच्या काही कृषी उत्पादने आयातीवर शुल्क कमी करण्याचे मान्य केले आहे. त्यात फ्रोझन टर्की, फ्रोझन बदक, ताजी ब्लुबेरी आणि क्रेनबेरी, फ्रोजन ब्लुबेरी आणि क्रेनबेरी, वाळलेली ब्लुबेरी आणि क्रेनबेरी तसेच प्रक्रियायुक्त ब्लुबेरी आणि क्रेनबेरी आदी कृषी उत्पादनांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये जागतिक व्यापार संघटनेत सुरू असलेले सहा विवाद यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी जून महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असता मिटविण्यात आले.

अमेरिकेचे कृषी सचिव टॉम विलसॅक यानंतर म्हणाले, की बायडेन प्रशासन भारतासह इतर व्यापार सहकाऱ्यांशी विश्वास आणि नाते घट्ट करण्याला प्राधान्य देत आहे. अमेरिका जागतिक व्यापार संघटना आणि इतर व्यासपिठांमध्ये इतर देशांसोबत सुरू असलेले विवाद सामंजस्याने सोडवून अमेरिकेच्या शेतीमालाला मोठ्या ग्राहक देशांमध्ये पूर्ण आणि बरोबरीची संधी प्रस्थापित करत आहेत.

अमेरिकेत भारताच्या निर्णयाचे स्वागत

खासदार रिक लार्सन यांनी भारताने अमेरिकेच्या फ्रोझन ब्लुबेरीजवरील आयात शुल्कात कपात केल्याच्या निर्णयाचे स्वागत केले. लार्सन यांनी अमेरिकेच्या प्रशानाने हा निर्णय घेण्यासाठी सतत पाठपुरावा केल्यामुळे आभारही मानले. आता अमेरिकेचे ब्लुबेरी उत्पादक शेतकरी इतर निर्यातदार देशांसोबत स्पर्धा करू शकतील, असेही लार्सन यांनी सांगितले.

अमेरिकेचे सिनेटर्स मार्क वार्नर आणि टीम केन यांनी म्हटले आहे, की भारताने काही कृषी उत्पादनांवरील आयातशुल्क कमी करण्याचा करार केला. या करारामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी घट्ट होतील. व्हर्जिनायातील पोल्ट्री उत्पादनांना या करारामुळे चांगली मागणी येईल आणि व्हर्जिनिया घाटीतील अर्थकारण यामुळे आणखी सुधारेल

भारताने अमेरिकेच्या टर्की, बदक, क्रेनबेरी आणि ब्लुबेरीवरील आयातशुल्क कमी करण्याचे मान्य केले आहे. यामुळे अमेरिकेच्या या कृषी उत्पादनांना भारताची मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
- टॉम विलसॅक, कृषी सचिव अमेरिका
भारताच्या मोठ्या आयातशुल्कामुळे अमेरिकेतील शेतकऱ्यांना टर्की निर्यातीवर मर्यादा आल्या होत्या. पण आता भारताने टर्की आयातीवरी शुल्क कमी केल्याने भारत आणि अमेरिका सरकारचे अभिनंदन. भारताने आयातशुल्क कमी केल्याने अमेरिकेतील शेतकऱ्यांसाठी भारतासारखी मोठी बाजारपेठ खुली झाली. तर भारताला अमेरिकेकडून परवडणाऱ्या दरात पौष्टिक आणि स्वादीष्ट प्रोटीन मिळेल.
- अॅमी क्लोबुचर, सिनेटर, अमेरिका

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT