India Paddy Production agrowon
ताज्या बातम्या

Paddy Production India : देशातील ९ राज्यात धानचे विक्रमी उत्पादन; एमएसपीमुळे शेतकऱ्यांना डबल नफा

India Paddy Production : देशातील पश्‍चिम बंगाल, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांत धान पिकाचे मोठ्य प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

Team Agrowon

Paddy production : देशातील पश्‍चिम बंगाल, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांत धान पिकाचे मोठ्य प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा उत्पादन भरघोस झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

दरम्यान धान पीक उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल ७३ टक्के नफा झाला आहे. धान पिकवण्याऱ्या शेतकर्‍यांचा नफा तब्बल गेल्या चार महिन्यांत १५ हजारवरून सरासरी २६ हजारांवर गेला आहे. ही आकडेवारी मार्केट फर्म रिसर्चनूसार काढण्यात आली आहे.

धान पिकाच्या उत्पादनाबरोबर त्याचा नफा वाढण्यास दोन प्रमुख घटक आहेत. धान पिकांचे उत्पादन घेताना त्यातील बारीक संशोधन करून त्याच्या वाढीवर जास्त भर देण्यात आला आहे. यानंतर केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमतीवर धान खरेदी केल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे.

मागच्या दोन वर्षात म्हणजे २०२० आणि २०२१ सप्टेंबरमध्ये सरकारने विक्रमी ६०.२५ दशलक्ष मेट्रीक टन धान खरेदी केली होती. दरम्यान मागच्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा धान पिकाचे उत्पादन कमी झाले आहे. परंतू २०२२-२३ मध्ये किमान आधारभूत किंमतीनुसार धान खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला आहे.

सरकारने केलेल्या सर्वेनुसार नऊ राज्यांमधील प्रमुख भात उत्पादक जिल्ह्यांतील ३ हजार ८०० शेतकऱ्यांचा समावेश आहे. २०१९ ते २०२२ या खरीप हंगामात हा अभ्यास करण्यात आला. सर्वेक्षणाचा भाग असलेल्या शेतकऱ्यांची सरासरी जमीन ६ एकर एवढी होती.

क्वालिटी कंट्रोल आणि रिसर्च इनसाईटच्या संशोधनानुसार, गेल्या तीन वर्षांत धानाचे सरासरी उत्पन्न १६ टक्क्यांनी वाढून १९.३ क्विंटल प्रति एकर वरून २२.४ क्विंटल प्रति एकर झाले आहे. परंतू मजूर मिळत नसल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार वर्षांत मजुरीच्या खर्चात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

याचबरोबर कर्नाटक, पश्चिम बंगाल, पंजाब आणि बिहार या चार राज्यांमध्ये मजुरांच्या खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. उत्पादक फवारण्या कमी करण्यासाठी ड्रोन आणि अधिक प्रभावी कीटकनाशकांसारखे चांगले तंत्रज्ञान शोधत असल्याची माहिती समोर आला आहे.

हा सर्वे केलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्ता सिरोही म्हणाल्या की, धान उत्पादक शेतकऱ्यांचा नफा वाढत असतानाही, उत्पादक अजूनही देशाच्या बहुतांश भागांमध्ये कीड आणि रोग व्यवस्थापनाबाबत चिंतित असल्याची त्यांनी माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT