Onion Agrowon
ताज्या बातम्या

Onion Market : लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक

Onion Arrival : ३७ हजार ५५० क्विंटल आवक; १० कोटींची उलाढाल

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Onion Rate : नाशिक : कांद्यासाठी प्रसिद्ध लासलगाव बाजार (Lasalgaon Bazar) समितीच्या मुख्य आवारात सोमवारी (ता. ३) २ हजार ३५ वाहनांमधून सर्वाधिक ३७ हजार ५५० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली.

त्यास बाजारभाव किमान ७००, कमाल २६५१ व सरासरी १४६० रुपये क्विंटल राहिला, अशी माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली.

सोमवारी बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा बाजार आवारात सकाळपासूनच कांद्याची आवक वाढली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाली.

दिवसभरात येथे ४६० ट्रॅक्टर व १५७५ पिकअप अशा एकूण २ हजार ३५ वाहनांतून ३७ हजार ५५० क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. 

रविवारी साप्ताहिक सुट्टीमुळे कांदा लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांनी सोमवारी कांदा विक्रीसाठी गर्दी केली. यापूर्वी जूनच्या तिसऱ्या सप्ताहात ३१ हजार ३२४ क्विंटल आवकेची नोंद झाली होती.

अडते, व्यापारी, मदतनीस, कामगार व बाजार समितीच्या सेवकांनी जलदगतीने लिलाव प्रक्रिया पूर्ण केल्याने विक्रमी कांदा आवकेचा लिलाव वेळेत पूर्ण करण्यात यश आल्याची माहिती सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.

खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर भांडवलाची गरज असल्याने सध्या आवक वाढली आहे. सर्व आवकेचे त्याच दिवशी लिलाव पूर्ण करून शेतकऱ्यांना रोख चुकवती केली जात आहे. सोमवारी सुमारे १० कोटी रुपयांची उलाढाल झाली. 

निफाड, विंचूरमध्येही मोठी आवक
लासलगावपाठोपाठ बाजार समितीच्या निफाड व विंचूर उपबाजार आवारावरही कांद्याची सर्वाधिक आवक झाली. निफाडमध्ये ६८६ वाहनांमधून ६ हजार ६०० क्विंटल कांदा विक्रीस आला. येथे किमान ५००, कमाल १७००, तर सरासरी १३५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

विंचूरमध्ये १५६१ वाहनांमधून २८ हजार ५०० क्विंटल कांदा विक्रीस आला. त्यास किमान ६००, कमाल १,९०१, तर सरासरी १४०१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT