Ajit Pawar Sharad Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Ajit Pawar Meets Sharad Pawar : भाजपबरोबर कधीच जाणार नाहीः शरद पवार

Maharashtra NCP Crisis : शरद पवार यांच्याविरोधात बंड करून सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रविवारी (ता. १६) अचानक त्यांची भेट घेतली. जो गुंता झालाय त्यातून मार्ग काढावा, अशी विनंती या नेत्यांनी श्री. पवार यांच्याकडे केल्याचे समजते.

Team Agrowon

Mumbai News : राष्ट्रवादीतील फुटीर अजित पवार गटाने रविवारी (ता. १६) अचानक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन दिलजमाईसाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. अजित पवार गटाने गुंत्यातून मार्ग काढण्याची विनंती केली खरी परंतु त्यावर शरद पवार यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही.

शरद पवार यांनी फुटीर गटाच्या नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले, त्यांना चहा पाजला आणि त्यांची बोळवण केली. उलट त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी आपण भाजपबरोबर कधीच जाणार नाही, असे स्पष्ट केले. 

अजित पवार गटाच्या नेत्यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ‘‘आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठींबा देऊ शकत नाही. आपली ती भूमिका नाही. यापुढेही पुरोगामी भूमिका घेऊनच आपल्याला पुढे जायचे आहे. आपण संघर्ष करू,’’ असे पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार यांच्याविरोधात बंड करून सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रविवारी (ता. १६) अचानक त्यांची भेट घेतली. जो गुंता झालाय त्यातून मार्ग काढावा, अशी विनंती त्यांनी पवारांकडे केली. तर ‘शरद पवार हे आमचे दैवत आहेत’, असे म्हणत आशीर्वादाची अपेक्षा केल्याचे बंडखोर नेत्यांनी सांगितले. मात्र श्री. पवार यांनी केवळ ऐकून घेत मौन धारण करणे पसंत केले.

बंडखोर नेत्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे श्री. पवार यांची अचानकपणे भेट घेतल्यानंतर तर्कवितर्कांना उधाण आले.

दरम्यान, एक तास ‘राष्ट्रवादी’च्या उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. या वेळी शरद पवार यांनी बंडखोर नेत्यांचे म्हणणे ऐकून घेणे पसंत केले. प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांच्यासह काही नेत्यांनी पवार यांची माफी मागितली. तसेच आशीर्वाद द्यावा, अशी विनंती केली. मात्र, त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. या वेळी सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या. शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना फोन करून बोलावून घेण्यास सांगितले.

‘शरद पवार आमचे दैवत’

शरद पवार यांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले, ‘‘आम्ही पवारांच्या पाया पडून आशीर्वाद मागितले. त्यांच्याविषयी आमच्या मनात आदरच आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध राहू शकतो. त्यासाठीही त्यांनी योग्य विचार करावा. येणाऱ्या दिवसांत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे, अशी आम्ही त्यांना विनंती केली.

मात्र त्यांनी या बाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ‘आमचे जे मत होते, विनंती होती, ती त्यांनी ऐकून घेतली. पवार साहेब आमचे सर्वांचे दैवत आहेत. पवार हे बैठकीसाठी येथे आले असल्याचे आम्हाला समजले. त्यानंतर आम्ही त्यांच्या भेटीची वेळ न मागता भेटीकरिता आलो.’’

‘कागदावर बळ आमचेच’

‘‘विरोधी पक्षनेत्यांबाबत आम्हा तीन पक्षांत चर्चा झाली आहे. आमच्यासोबत बसणाऱ्या आमदारांची संख्या पाहून निर्णय घेतला जाईल. आमच्यासोबत १९ ते २० आमदार आहेत. बरेच दोन्हीकडे आहेत असे दाखवत आहेत.

आम्ही स्वतः:हून कुठल्या आमदारांना बोलविले नाही. सर्वच आमदार शरद पवार यांच्यासोबत राहण्याच्या मानसिकतेत आहे. कागदावर बळ आमचेच आहे,’’ असे ‘राष्ट्रवादी’चे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ind-US Trade Conflict : शेतकरी हितासाठी कोणताही किंमत मोजायला तयार: पंतप्रधान मोदी यांचे डोनाल्ड ट्रम्पला उत्तर

Agriculture Development: शेतकरी हिताच्या सूचनांना मान्यता कधी?

Maharashtra Startup Policy: स्टार्ट अप : संधी अन् आव्हाने

Agriculture Success Story: नाशिकच्या मातीत घेतले ‘ॲव्होकॅडो’चे यशस्वी उत्पादन

Alephata Onion Rate: आळेफाटा येथील उपबाजारात कांदा प्रति क्विंटलला १६०० रुपये

SCROLL FOR NEXT