Land Survey Agrowon
ताज्या बातम्या

Land Survey : उमरोलीत महामार्गासाठी पुन्हा जमीन मोजणी

दोनदा मोजणी केली तरी संबंधित शेतकऱ्यांची नावे समाविष्ट होत नसल्याने जमीनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Team Agrowon

चिपळूण ः जमिनीच्या मालकी हक्कावरून गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण ते गुहागरदरम्यान रस्त्याचे रुंदीकरण (Highway Expantion) दोन वर्षे रखडले होते. त्यानंतर गुहागर ते रामपूरदरम्यान रस्ता रुंदीकरणांतर्गत सिमेंट काँक्रिटचा रस्ता झाला.

मात्र, तब्बल दोन वर्षांनी काल (ता. ४) पुन्हा उमरोली येथे रस्त्यासाठी जमिनीची मोजणी करण्यात आली. दोनदा मोजणी (Land Survey) केली तरी संबंधित शेतकऱ्यांची नावे समाविष्ट होत नसल्याने जमीनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

रामपूर सुतारवाडी ते चिवेलीपर्यंत दुसऱ्यांदा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मध्य केंद्रापासून नऊ मीटर रस्ता मोजण्यात आला. रस्त्याच्या एका बाजूला अंजनवेल, वेलदूर येथील गॅस प्रकल्पाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी आहे.

रस्त्याच्या मध्यापासून जलवाहिनीच्या बाजूला नऊ मीटर रस्ता मोजणीसाठी सर्वेक्षण सुरू आहे. पाइपलाइनच्या बाजूची जागा जमीनमालकांची असली तरी त्यांना कोणताही मोबदला मिळाला नाही.

या विषयी जमीनमालकांमध्ये तीव्र असंतोष आहे. ज्या जमीनमालकांची जागा रस्त्यासाठी संपादित केली, त्यांनाही अद्याप मोबदला मिळाला नाही. त्यानंतर आता रस्त्याचे काम मार्गी लागल्यावर दुसऱ्यांदा मोजणी केली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT