Land Survey : शेतजमीन मोजणीपासून सात गावे वंचित

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा महसूल मंडळातील सात गावांना सुमारे सहा दक्षके उलटूनही शेतजमिनीला गट स्कीम लागू झालेली नसल्याने सात गावांतील शेतकऱ्यांची शासकीय कामे होत नसून याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
Counting Agricultural Land
Counting Agricultural LandLouis Allen
Published on
Updated on

चिमठाणे, जि.धुळे ः शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा महसूल मंडळातील सात गावांना सुमारे सहा दक्षके उलटूनही शेतजमिनीला (Agriculture Land) गट स्कीम लागू झालेली नसल्याने सात गावांतील शेतकऱ्यांची शासकीय कामे होत नसून याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सात गावांत लवकरात लवकर गट स्कीम लागू, करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Counting Agricultural Land
Crop Insurance : मंत्री सावे यांनी पीक विमा कंपन्यांना दिला इशारा | ॲग्रोवन

तालुक्यातील रामी, निमगूळ, टाकरखेडा, तावखेडा (प्र. नंदुरबार), वडदे, चावळदे व कुरकवाडे येथील शेतकऱ्यांना शेतजमीन मोजणी करताना व खरेदीखत नोंदविताना अडचणी येत असून, सातबारा उतारा अद्यापही सर्व्हे क्रमांकाचा असल्याने शेतजमिनीची मोजणी होत नसून सर्व्हे क्रमांक आणि गट क्रमांकाच्या क्षेत्रात तफावत असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तालुक्यात १९६२ मध्ये गट स्कीम लागू झाल्यानंतरदेखील या सात गावांना गट क्रमांक का देण्यात आला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तालुक्यातील रामी, निमगूळ, टाकरखेडा, तावखेडा (प्र. नंदुरबार), वडदे, चावळदे व कुरकवाडे या सात गावांतील शेतजमिनीला गट स्कीम लागू झाली असून, या गावांच्या गटाचे नकाशे व सर्व्हे क्रमांकांचे नकाशे उपलब्ध असूनही गावांत गट स्कीम का लागू झाली नाही याबाबत सांगता येणार नाही. त्या वेळी काय परिस्थिती होती याबाबत माहिती नाही. या सात गावांना गट स्कीम लागू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे.

-दत्तात्रय वाघ, उपअधीक्षक भूमिअभिलेख, शिंदखेडा (जि.धुळे)

Counting Agricultural Land
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

रामी, निमगूळ, टाकरखेडा, तावखेडा (प्र. नंदुरबार), वडदे, चावळदे व कुरकवाडे या गावांच्या गटाचे नकाशे उपलब्ध नसल्याने या गावांत गट क्रमांक देता येत नाही. यामुळे या गावांना गट स्कीम लागू करता येत नाही. याबाबत पुणे जमावबंदी आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनानंतर याबाबत निर्णय घेता येईल.

-आशा गांगुर्डे, प्रभारी तहसीलदार, शिंदखेडा (जि.धुळे)

टाकरखेडा येथील शेतजमिनीच्या सर्व्हे क्रमांकाचे सातबारा उतारे असल्याने शेतजमिनीची मोजणी करता येत नसल्याचे उत्तर सिटी सर्व्हेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. -अजयसिंह राठोड, शेतकरी, टाकरखेडा (ता.शिंदखेडा, जि.धुळे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com