Ravikant Tupkar
Ravikant Tupkar Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : आत्मदहनाच्या भूमिकेवर रविकांत तुपकर ठाम

Team Agrowon

Crop Insurance बुलडाणा ः पीकविमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन-कापूस दरवाढ (Soybean Cotton Rate) या मुद्यांसाठी रविकांत तुपकर (Ravikant Tupakar) यांनी शेतकऱ्यांसह शनिवारी (ता. ११) आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा भारतीय कृषी विमा कंपनी लि. (एआयसी) पीकविमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मुंबई येथील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असून, पोलिस यंत्रणेची पळापळ सुरू झाली आहे.

आंदोलन करू नये यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस सुद्धा बजावली आहे. मात्र आपण आता माघार घेणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे

या वर्षी त्यांनी कापूस, सोयाबीन दरवाढ व इतर मुद्यांवर सप्टेंबर महिन्यापासून आंदोलन सुरू केले आहे. तसेच विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत या प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत चर्चाही केली.

मात्र केंद्र व राज्य सरकारकडून अपेक्षित काहीही घडले नसल्याने अखेरीस या मुद्यांवर कायमचा तोडगा काढण्यासाठी आपण आता आत्मदहन करू, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

शनिवारी हे आंदोलन पुकारले असून, आत्मदहन आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मंगळवार (ता. ७)पासून तुपकर भूमिगत झाले आहेत.

दरम्यान, बुलडाणा शहर पोलिसांनी त्यांना या आंदोलनाबाबत नोटीस बजावली आहे. हे आंदोलन करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

परंतु आपण आरपारची लढाई लढण्यासाठी तयार असून आता शहीद झालो तरी माघार नाही, असे तुपकरांनी फेसबुक लाइव्ह येत स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

SCROLL FOR NEXT