Milk Rate Agrowon
ताज्या बातम्या

Milk Rate Protest : दूधदरप्रश्‍नी ‘स्वाभिमानी’चे राहुरीत उद्या ‘रास्ता रोको’

Swabhimani Shetkari Sanghatana : शासन नियुक्त समितीच्या शिफारशीवरून गाईच्या दुधाला ३४ रुपये दर दिला असला तरी फॅट व ‘एफएनएस’च्या रिटर्नचे दर दूध संघ चालकांनी मनमानी पद्धतीने वाढविले आहेत.

Team Agrowon

Nagar News : ‘‘शासन नियुक्त समितीच्या शिफारशीवरून गाईच्या दुधाला ३४ रुपये दर दिला असला तरी फॅट व ‘एफएनएस’च्या रिटर्नचे दर दूध संघ चालकांनी मनमानी पद्धतीने वाढविले आहेत. यामुळे पूर्वीपेक्षा शेतकऱ्यांच्या दुधाला कमी दर मिळेल. त्यामुळे शासनाची ही फसवी दूधदरवाढ असून, ही मनमानी थांबवावी.

रिटर्नचे दर पूर्वीप्रमाणे ठेवावेत, या मागणीसाठी राहुरी येथे उद्या (ता. २८) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,’’ अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांनी दिली. त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.

दुग्धजन्य पदार्थ, बटर व पावडरचे दर कमी झाल्याचे सांगत खासगी दूध संघ चालकांनी गाईच्या दुधाचे दर ३८-३९ वरून ३२ रुपयांवर आणले होते. त्यानंतर दूध दराबाबत निश्‍चिती करण्यासाठी शासनाने दूध व्यवसायातील जाणकारांची समिती नियुक्त केली. या समितीच्या शिफारशीवरून गाईच्या दुधाला ३४ रुपये प्रतिलिटर दूध देण्याचे आदेश दिले. त्यानुसार ३.५ फॅट व ८.५ ‘एफएनएस’ असलेल्या दुधाला हे दर मिळतील.

हे दर देतानाच खासगी दूध संघचालकांच्या संघटनेने मात्र त्यापेक्षा प्रत्येक कमी पॉइंटला १ रुपया कपात करण्याचे आदेश काढले. आधी ही कपात प्रत्येक पॉइंटला ३० पैसे होती. सध्याचे पावसाळ्याचे दिवस, हवामानातील आर्द्रता, हिरवा चारा यामुळे गाईच्या दुधाला ३.५ फॅट वव ८.५ एफएनएस लागत नाही.

त्यामुळे रिटर्नचे दर वाढविल्याने वाढीव दर मिळण्याऐवजी उलट कमी दर मिळेल. मनमानी करून शेतकऱ्यांना कायम लुटणाऱ्यांनी दुधाचे दर पाडण्यासाठी ही नवी शक्कल लढवली आहे. त्यांना शासन पाठीशी घालत असल्याचा आरोप ‘स्वाभिमानी’ने केला.

रिटर्नची दरवाढ रद्द करून पूर्ववत ठेवावी. ३.५ फॅट व ८.५ एफएनएस ऐवजी ३.३ फॅट व ८.३ ‘एसएनएफ’ला निश्‍चित केलेला दर मिळावा, या मागणीसाठी हे आंदोलन होईल, असे मोरे म्हणाले. सचिन उंडे, विलास तनपुरे, जुगल गोसावी, सचिन गुडगुळे, नितीन मोरे, सचिन म्हसे, बाळासाहेब जाधव, प्रमोद पवार, प्रकाश देठे, सतीश पवार, रवींद्र आढाव, रमेश मोरे, सुनील इंगळे, सचिन पवळे, राहुल करपे, संदीप शिरसाट आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी

Solapur Water Shortage: सोलापुरात टंचाई निवारणासाठी ९.६७ कोटींचा कृती आराखडा

Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी

Rabi Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर

Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना

SCROLL FOR NEXT