Rasta-Roko for Onion Rate Agrowon
ताज्या बातम्या

Rasta-Roko for Onion Rate : मनमाड-चांदवड मार्गावर कांदा दरासाठी रास्ता-रोको

कांद्याला चांगला दर मिळावा यासाठी महाविकास आघाडीने शुक्रवारी (ता. १७) सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मनमाड-चांदवड रस्त्यावरील बाजार समितीच्या गेटवर रास्ता-रोको आंदोलन केले.

Team Agrowon


मनमाड, जि. नाशिक ः सध्या कांद्याचे दर दररोज घसरत आहेत. घसरणाऱ्या दरामुळे शेतकऱ्याला कांद्याचा उत्पादन खर्च (Onion Production Cost) देखील मिळत नाही.

त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांद्याला चांगला दर (Onion Rate) मिळावा यासाठी महाविकास आघाडीने शुक्रवारी (ता. १७) सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मनमाड-चांदवड रस्त्यावरील बाजार समितीच्या गेटवर रास्ता-रोको (Rasta Roko) आंदोलन केले.

मनमाड येथे महाविकास आघाडी तर्फे मनमाड-चांदवड रस्त्यावर बाजार समिती गेटसमोर आंदोलकांनी कांदा ओतला. कांद्याला भाव मिळावा, निर्यात बंदी उठवावी, खतांच्या किमती कमी कराव्या, अशा विविध मागण्यांसाठी हा रास्ता-रोको करण्यात आला.

या आंदोलनात शेतकरी सहभागी झाले होते. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झालेल्या या रास्ता-रोको आंदोलनामुळे मनमाड-चांदवड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्ते यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT