Sugar Cane FRP Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane FRP : ऊसदर प्रश्नी सिंगणापूर फाटा येथे ‘स्वाभिमानी’चा रास्तारोको

उसाला प्रतिटन एफआरफपी अधिक ३५० रुपये भाव द्यावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. १४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील सिंगणापूर फाटा (ता. परभणी) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

परभणी ः उसाला प्रतिटन एफआरफपी (Sugar Cane FRP) अधिक ३५० रुपये भाव द्यावा यासह शेतकऱ्यांच्या (Farmer) विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. १४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील सिंगणापूर फाटा (ता. परभणी) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन एफआरपी अधिक ३५० रुपये भाव द्यावा. ऊस तोडीसाठी शेअर्सची अट रद्द करण्यात यावी. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना पीकविमा तसेच शासनाकडून आर्थिक मदत तत्काळ देण्यात यावी आदी मागण्यांसाठी करण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दामुअण्णा इंगोले, भास्कर खटींग, गजानन तुरे, डिंगाबर पवार, रामप्रसाद गमे, बाळासाहेब घाटुळ, मुंजाजी लोडे, केशव आरमळ आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT