Rain Agrowon
ताज्या बातम्या

Nanded Rain : नांदेडला पावसाचा मुक्काम वाढला

Nanded Rain Update : नांदेड जिल्ह्यात मागील पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर रविवारी पावसाने सुरुवात केली होती. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात झाला.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात रविवारी झालेल्या पावसानंतर पुन्हा सोमवारी व मंगळवारीही पाऊस झाला. यानंतर बुधवारी ही जिल्ह्याच्या सर्वच ठिकाणी पाऊस झाला. हा पाऊस किनवट, बिलोली, मुखेड, देगलूर, उमरी, नायगाव, माहूर तालुक्यात झाला.

मागील २४ तसाच सरासरी १६.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या ७३०.४० मिलिमीटर नुसार ८३.८१ टक्के पाऊस झाला आहे.

नांदेड जिल्ह्यात मागील पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर रविवारी पावसाने सुरुवात केली होती. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात झाला. यावेळी दमदार झालेल्या पावसामुळे तब्बल दहा मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली होती. यानंतरही सोमवारी पावसाने जिल्ह्यात सर्वच तालुक्यात हजेरी लावली. हा पाऊस किनवट, माहूर, धर्माबाद, बिलोली, देगलूर, माहूर, नायगाव तालुक्यात झाला.

पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे किनवट तालुक्यातील शिवनी व नरंगल बुद्रूक मंडलात अतिवृष्टी नोंदली होती. यानंतर जिल्ह्यात सर्व तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी १६.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आजपर्यंत ७३०.४० मिलिमीटरनुसार वार्षिक सरासरीच्या ८३.८१ टक्के पाऊस झाला आहे

तालुकानिहाय झालेला पाऊस

नांदेड २.५०, बिलोली १६.३०, मुखेड २१.१०, कंधार १९.१०, लोहा २३.१०, हदगाव ६.६०, भोकर १५.५०, देगलूर ३१.३०, किनवट २५, हिमायतनगर ३, माहूर ४२.४०, धर्माबाद २१.८०, उमरी ४, अर्धापूर ९.८०,

नायगाव ७.४० मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी १६.६० मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात आजपर्यंत ७३०.४० मिलिमीटर नुसार वार्षिक सरासरीच्या ८३.८१ टक्के पाऊस झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E Crop Registration: अमरावतीत ७९ टक्के शेतकऱ्यांचा ऑनलाइन पीक पेऱ्याला खो

Jal Jeevan Mission: जलजीवन योजनेचे काम रखडल्याने टंचाईच्या झळा

Pesticide Company Inspection: ‘ड’ वर्गातील कीडनाशक कंपन्या रडारवर

LPG Cylinder Crisis: एलपीजी सिलिंडरमधून मिळणार केवळ १० किलो गॅस

Milk Adulteration MCOCA Action: दूध भेसळखोरांवर ‘मकोका’चा बडगा

SCROLL FOR NEXT