Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : काढणीला आलेल्या पिकांवर पावसाचे ढग

सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावत पिकांचे मोठे नुकसान केले. शुक्रवार (ता. १४)पासून पाऊस काहीसा ओसरला असला, तरी पावसाचे ढग मात्र कायम आहेत.

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार (Heavy Rainfall) हजेरी लावत पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) केले. शुक्रवार (ता. १४)पासून पाऊस काहीसा ओसरला असला, तरी पावसाचे ढग मात्र कायम आहेत. दरम्यान, उजनी धरणाकडे (Ujani Dam) येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कायम आहे. तसेच उजनीतूनही पुढे भीमा नदीतील (Bheema River) विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आली.

अलीकडच्या चार-पाच दिवसांत दिवसभर ऊन आणि सायंकाळनंतर पाऊस असे वातावरण होते आहे. गुरुवारी (ता. १३) पावसाने काहीकाळ विश्रांती घेतली. रात्री त्याने पुन्हा हजेरी लावली. शुक्रवारी मध्यरात्री काही भागांत पावसाने हलकी हजेरी लावली. तर सकाळपासून ढगाळ वातावरण राहिले. दिवसभर कधी ऊन- कधी ढगाळ असे वातावरण राहिले.

जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळ, माढा, करमाळा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी अशा बहुतांश सर्व भागांत पाऊस होतो आहे. खरिपातील सोयाबीन सध्या काढणी सुरू आहे. ऐन काढणीच्या हंगामातील पावसामुळे मोठे नुकसान होत आहे.

त्याशिवाय सततच्या पावसामुळे द्राक्ष, सीताफळ, आंबा, पेरू, डाळिंब या पिकांवरही कीड-रोगाच्या आपत्तीसह नुकसान होत आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्राथमिक माहितीनुसार गेल्या चार-पाच दिवसांतील पावसामुळे साधारण ११ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

‘उजनी’तून भीमा नदीत विसर्ग वाढवला उजनी धरणाच्या वरच्या धरणांकडून शुक्रवारी (ता. १४) पाण्याचा विसर्ग कायम राहिला. दौंडकडून उजनीमध्ये १४ हजार ६५ क्युसेक इतके पाणी मिसळत होते.

तर उजनीतून पुढे भीमा नदीत ३० हजार क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात येत होता. गुरुवारपर्यंत हा विसर्ग २० हजार क्युसेक इतका होता. शुक्रवारी तो आणखी दहा हजार क्युसेकने वाढवण्यात आला. धरणात येणाऱ्या आणि धरणातून सोडल्या जाणाऱ्या दोन्ही बाजूंकडील पाण्याचे योग्य पद्धतीने नियंत्रण केल्याने धरणाची पाणी पातळी मात्र स्थिर होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे २.९१ लाख कोटींचे कर्ज प्रलंबित; लोकसभेत केंद्र सरकारने दिली आकडेवारी

Fish Farming: क्षारपड जमिनीत मत्स्य संवर्धनाला मोठी संधी 

MGNREGA Scheme: ‘मनरेगा’ ते ‘पूज्य बापू’ प्रवास!

Nagpur Winter Session: बौद्धिक दिवाळखोरी

Sugarcane Cultivation: सिंचनात वाढ अन् ऊस लागवडीला आला भर

SCROLL FOR NEXT