Heavy Rain Agrowon
ताज्या बातम्या

Rain : मध्य महाराष्ट्र, विदर्भासह घाटमाथ्यावर पाऊस सुरूच

मॉन्सून सक्रिय असल्याने राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोकण, घाटमाथ्यासह, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम होता.

टीम ॲग्रोवन

पुणे : मॉन्सून (Monsoon) सक्रिय असल्याने राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. कोकण, घाटमाथ्यासह, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर (Rain Intensity) कायम होता. रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाने दणका दिला आहे.

घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असून, सातारा जिल्ह्यातील शिरगाव येथे सर्वाधिक ३१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर येथे २३० मिलिमीटर पाऊस झाला. दावडी येथे ३०० मिलिमीटर पाऊस झाला. लोणावळा येथेही २०० मिलिमीटर पाऊस पडला.

कोकणातही अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यात मात्र पावसाने उघडीप दिल्याचे दिसून आले.

राज्यात गुरूवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :

सावंतवाडी १७०, माथेरान १३०, खेड १२०, तळा ११०, दापोली, वाकवली प्रत्येकी १००, मंडणगड ९०, म्हसळा, जव्हार, अंबरनाथ, महाड, लांजा, मुरबाड प्रत्येकी ८०, कल्याण, उल्हासनगर, रोहा, ठाणे, शहापूर, पेण प्रत्येकी ७०, पोलादपूर, सुधागडपाली, श्रीवर्धन, कर्जत प्रत्येक ६०, भिवंडी, मोखेडा, माणगाव, विक्रमगड, पनवेल प्रत्येकी ५०.

मध्य महाराष्ट्र :

महाबळेश्वर २३०, लोणावळा २००, वेल्हे १७०, चंदगड, इगतपुरी प्रत्येकी १२०, यवल ११०, आजरा १००, जावळी ९०, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा प्रत्येकी ७०, गगनबावडा, पौड प्रत्येकी ६०, साक्री, सिंदखेडा, अक्कलकुवा, वडगावमावळ प्रत्येकी ५०, भोर, रावेर प्रत्येकी ४०, नवापूर, गारगोटी, गिधाडे, तळेगाव, त्र्यंबकेश्वर, धुळे, पेठ, हर्सूल, सुरगाणा, मुक्ताईनगर, चोपडा प्रत्येकी ३०.

....

विदर्भ :

तुमसर, कोर्ची, गोंदिया, आमगाव प्रत्येकी ५०, वरूड, तिरोडा, नरखेडा, रामटेक, गोरेगाव, अकोट, देसाईगंज, कुरखेडा, धारणी, गोंदिया, संग्रामपूर, अंजनगाव, कुही, तेल्हारा, दर्यापूर, मूर्तिजापूर, अमरावती, सावनेर, परतवाडा, सालकेसा, चांदूरबाजार, बटकुली, उरमेड, पारशिवणी, अकोला प्रत्येकी ३०.

घाटमाथा :

शिरगाव ३१०, दावडी ३००, अंबोणे २४०, डुंगुरवाडी २१०, लोणावळा १७०, कोयना नवजा १६०, वळवण १४०, भिरा १३०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cooperative Institute : सभासदांना १८ टक्के लाभांश देणार ः ठोंबरे

Rain Crop Damage : शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा गेल्या ‘पाण्यात’

Azolla Cultivation: अझोलाचे उत्पादन कसे करावे?

Indian Agriculture 2025: थंडी यंदा रब्बी पिकांना असह्य होण्याचा धोका; IMDच्या अपडेटनंतर ICAR अलर्टवर!

APMC Farmer Facility : शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास ः सूर्यकांत पाटील

SCROLL FOR NEXT