Rain Update
Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Rain : धरणांच्या पाणलोटात कोसळधार सुरूच

टीम ॲग्रोवन

पुणे : मॉन्सून (Monsoon) सक्रिय असल्याने घाटमाथ्यावर पावसाची कोसळधार (Rainfall) सुरूच आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर असणाऱ्या ताम्हिणी येथे शुक्रवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सर्वाधिक ३१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने जायकवाडीपाठेपाठ उजनी, कोयनेसह प्रमुख धरणांतून पाण्याचा विसर्ग (Water Discharge From Dam) करण्यात आला आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाने तडाखा दिला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडला आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात इतरही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावली आहे. मात्र मराठवाड्यात दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. विदर्भात पावसाचा जोर ओसरला आहे.

कोकण विभागातील भातसा, मराठवाड्यातील जायकवाडी, ऊर्ध्वपैनगंगा, विदर्भातील पेंचतोतलाडोह, गोसीखुर्द, इरई, निम्नवर्धा, अमरावती विभागातील ऊर्ध्ववर्धासह इतर धरणे, नाशिक विभागातील दारणा, गिरणा, हतूनर, पुणे विभागाच्या भीमा खोऱ्यातील डिंभे, पानशेत, खडकवासला, चासकमान, घोड, वीर, कन्हेर, उजनी, कृष्णा खोऱ्यातील वारणा, दुधगंगा, राधानगरी, कोयना या प्रमुख धरणांसह इतरही धरणांतून कमी अधिक प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी, भीमा, कृष्णा खोऱ्यातील नद्या ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे.

राज्यात शुक्रवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :

लांजा, जव्हार, तळा प्रत्येकी ८०, माथेरान, पोलादपूर, सुधागड पाली प्रत्येकी ७०, मोखेडा, मालवण, कणकवली, खालापूर, शहापूर प्रत्येकी ६०, महाड, कर्जत, संगमेश्वर, खेड, मंडणगड, पेण, पनवेल प्रत्येकी ५०.

......

मध्य महाराष्ट्र :

महाबळेश्वर १९०, लोणावळा १६०, राधानगरी १६०, वेल्हे १३०, आजरा, इगतपुरी प्रत्येकी ११०, शाहूवाडी ९०, चंदगड, जावळीमेढा, त्र्यंबकेश्वर प्रत्येकी ७०, पन्हाळा, पेठ प्रत्येकी ५०, गडहिंग्लज, ओझरखेडा, पौड प्रत्येकी ४०, वडगाव मावळ, गारगोटी, हर्सल प्रत्येकी ३०.

घाटमाथा :

ताम्हिणी ३१०, शिरगाव २१०, अंबोणे १८०, वळवण १००, शिरोटा ९०, ठाकुरवाडी, भिरा प्रत्येकी ७०, वाणगाव, भिवपुरी, खंद प्रत्येकी ६०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT