Rahul Gandi Agrowon
ताज्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सुरू

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला बुधवारपासून (ता. ७) प्रारंभ झाला. यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी तमिळनाडूतील श्रीपेरुंबदूर येथे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मारकाला भेट दिली.

टीम ॲग्रोवन

कन्याकुमारी (वृत्तसंस्था) ः काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandi) यांच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) बुधवारपासून (ता. ७) प्रारंभ झाला. यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी तमिळनाडूतील श्रीपेरुंबदूर येथे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या स्मारकाला भेट दिली.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला कन्याकुमारीपासून प्रारंभ झाला. ते रोज किमान २० किलोमीटर अंतर पायी जातील. या पाच महिन्यांत १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असणार आहे. या यात्रेचे एकूण अंतर सुमारे ३५०० किलोमीटर असेल. ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरू होऊन काश्मीरमध्ये संपेल.

कन्याकुमारी, तिरुवनंतपुरम, कोची, निलांबूर, म्हैसूर, बेल्लारी, रायचूर, विकाराबाद, अकोला, नांदेड, जळगाव जामोद, इंदूर, कोटा, दौसा, अलवर, बुलंदशहर, दिल्ली, अंबाला, पठाणकोटमार्गे जम्मू आणि श्रीनगरमध्ये यात्रेची सांगता होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Dispute Resolution: पोलिसांच्या पुढाकाराने रस्त्यांचे १०४ वाद मिटले

Bird Flu: दीड हजार कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’

Banana Crop Care : उन्हाळ्यात केळी बागेचे नुकसान टाळण्यासाठी ५ उपाय!

Sangli District Bank: सांगली जिल्हा बॅंकेच्या शताब्दी वर्षात ठेवी १० हजार कोटी करणार

Bhausaheb Fundkar Scheme: भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध

SCROLL FOR NEXT