Ragi Agrowon
ताज्या बातम्या

Ragi : सिंधुदुर्गमध्ये नाचणी लागवड अंतिम टप्प्यात

भात रोप लागवड केल्यानंतर नाचणी रोप लागवडीला सुरुवात केली जाते. परंतु भातरोप लागवडीनतंर काही दिवस पावसाने दडी मारली.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात काही दिवस पावसाअभावी (Lac Of Rain) तर काही दिवस अति मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) खोळंबलेली नाचणी रोप लागवड (Ragi Plantation) आता अंतिम टप्प्यात आहे. सध्या लागवडीयोग्य पाऊस पडत असल्यामुळे पाच-सहा दिवसांत लागवड पूर्ण होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात नाचणी लागवडीखालील क्षेत्र दोन हजार हेक्टर आहे. भात रोप लागवड केल्यानंतर नाचणी रोप लागवडीला सुरुवात केली जाते. परंतु भातरोप लागवडीनतंर काही दिवस पावसाने दडी मारली. कडक ऊन असल्यामुळे नाचणी रोप लागवड करणे शेतकऱ्यांनी टाळले.

त्यानंतर एक दोन दिवस नाचणी रोप लागवडीयोग्य पाऊस पडला. परंतु त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नाचणी रोप लागवड करणे शक्य झाले नाही. परंतु गेले पाच-सहा दिवस जिल्ह्यात लागवडीयोग्य पावसाच्या सरी पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाचणी लागवड गतीने सुरू केली आहे. सध्या लागवड अंतिम टप्प्यात असून येत्या पाच सहा दिवसांत लागवड पूर्ण होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT