Farming
Farming Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Season : रब्बी ज्वारीचे क्षेत्र खानदेशात वाढणार

Team Agrowon

जळगाव ः  खानदेशात यंदा रब्बी ज्वारीचे (Rabbi Season) क्षेत्र सुमारे आठ हजार हेक्टरने वाढले आहे. सुमारे ६० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. दरवर्षी ४५ ते ५२ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी केली जाते. पारंपरिक दादर (कोरडवाहू) ज्वारीची पेरणीदेखील कायम आहे. यातच कृत्रीम जलसाठाधारकांनी संकरित, विद्यापीठांकडून संशोधित ज्वारीची पेरणी केली आहे. मका, गहू पिकाऐवजी या ज्वारीकडे शेतकरी वळले आहेत.

ज्वारीपासून सकस चारा व चांगले धान्यही मिळते. दादर किंवा रब्बी ज्वारीचे उत्पादनही चांगले येते. त्याला सर्वत्र मागणी असते. मागील दोन हंगामात कोविडचा फटका ज्वारी पिकाला बसला. परंतु पुढे दरांत मोठा फटका बसणार नाही, असे गृहीत धरून अनेकांनी ज्वारीची पेरणी केली आहे. मागील दोन हंगामात ज्वारीचे दर प्रतिक्विंटल सरासरी १८०० रुपये एवढेच मिळाले. पण पुढे दर २५०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक मिळतील, अशी अपेक्षा आहे. कारण बाजार व्यवस्थित सुरू आहे. तसेच शासनाकडूनही खरेदीची घोषणा होईल. यामुळे ज्वारीची पेरणी यंदा बऱ्यापैकी वाढली आहे.

रब्बी ज्वारीला काळ्या कसदार जमिनीत दोनदा सिंचन करावे लागते. तर हलक्या जमिनीत तीनदा सिंचन करून चांगले पीक हाती येते. शिवाय मक्यासारखा अमेरिकन लष्करी अळी, खेते, फवारण्या व इतर अधिकचा खर्च नाही. यामुळे शेतकरी ज्वारीकडे वळत असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्वारीची पेरणी सुरूच आहे.

काही शेतकरी उशिरा पेरणीच्या वाणांची निवड करीत आहेत. ज्वारीची पेरणी खानदेशात धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर, जळगाव, चोपडा आदी भागात केली आहे. तापी, गिरणा, पांझरा, अनेक नदीकाठी ही पेरणी अधिक दिसत आहे.

यंदा बाजार खुला आहे. मागील हंगामात लॉकडाऊनच्या भितीतही दादर ज्वारीला दर २८०० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. तसेच दादरचा कडबाही तेजीत होता. यामुळे यंदा ज्वारीचे क्षेत्र वाढले आहे. काही शेतकरी अजूनही संकरित ज्वारीची पेरणी करीत आहेत. भडगाव, चाळीसगाव, अमळनेर, जळगाव आदी भागात संकरित ज्वारी अधिक असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; पावसासोबतच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका कायम

Fodder News : विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा; पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश

Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

Crop Management : जमीन, पाऊसमानानुसार करा कोरडवाहू पिकाचं नियोजन

Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

SCROLL FOR NEXT