Rabi Sowing
Rabi Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : सव्वीस लाख हेक्टरवर रब्बी प्रस्तावित

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : येत्या रब्बी हंगामासाठी (Rabi Sowing) मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत २६ लाख ७९ हजार ३९६ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी (Rabi Sowing) प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामध्ये औरंगाबाद कृषी विभागांतर्गत (Agriculture Department) तीन जिल्ह्यांत १० लाख हेक्टरवर, तर लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांत १६ लाख ७९ हजार ३९६ हेक्टर वरील प्रस्तावित क्षेत्राचा समावेश आहे.

रब्बी हंगामपूर्व ७२ व्या विभागीय संशोधन व विस्तार सल्ला समिती बैठकीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांनी आपल्या रब्बी हंगाम नियोजनाचे सादरीकरण केले त्यानुसार औरंगाबाद कृषी विभागातील औरंगाबाद जालना व बीड या तीन जिल्ह्यांत रब्बीचे सरासरी क्षेत्र ८ लाख १५ हजार हेक्टर आहे.

गतवर्षी ९ लाख ६९ हजार हेक्टरवर रब्बीची प्रत्यक्ष पेरणी झाली होती. खरिपावर आलेल्या संकटामुळे सरासरी क्षेत्राच्या पुढे जाऊन झालेली त्या वेळीची पेरणी बघता यंदाही खरीपावर संकट असल्याने रब्बीची पेरणी क्षेत्र वाढण्याची कृषी विभागाला आशा आहे त्यामुळे यंदा १० लाख हेक्टर वर रब्बीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.

लातूर कृषी विभागात येणाऱ्या पाच जिल्ह्यांत रब्बीची सरासरी क्षेत्र १० लाख ८६ हजार ६०७ हेक्टर इतकी आहे त्या तुलनेत २०२१ २२ च्या रब्बी हंगामात १५ लाख ६८ हजार २३४ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती नांदेड जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत जवळपास अडीच पट तर इतर जिल्ह्यात सरासरी क्षेत्रापेक्षा सव्वा ते दीडपट क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती

खरीप हंगामावर आलेल्या संकटामुळे रब्बीचे क्षेत्र वाढले होते यंदाही खरिपावर मोठे संकट आहे विभागातील जवळपास सात लाख छत्तीस हजार हेक्टर वरील शेती पिकाचे अतिवृष्टी पूर गोगलगायी च्या संकटामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे त्यामुळे यंदाही रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन लातूर कृषी विभागाने पाच जिल्ह्यात १६ लाख ७९ हजार ३९६ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी प्रस्तावित केली आहे.

जिल्हानिहाय सरासरी व प्रस्तावित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी क्षेत्र प्रस्तावित क्षेत्र

औरंगाबाद २ लाख ४४ हजार २ लाख ६० हजार

जालना १ लाख ७२ हजार ३ लाख

बीड ३ लाख ९९ हजार ४ लाख ४० हजार

लातूर २ लाख २८ हजार ४३ ३ लाख ५३ हजार ४५०

उस्मानाबाद ३ लाख ७५ हजार ४१ ४ लाख ४४ हजार ८९३

नांदेड १ लाख ४० हजार २२३ ४ लाख

परभणी २ लाख १५ हजार ९६१ २ लाख ७८ हजार ३९८

हिंगोली १ लाख २७ हजार ३४० २ लाख २ हजार ६५५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT