Water Storage Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Irrigation : रब्बी, उन्हाळी हंगामासाठी सिंचनाची चिंता मिटली

जिल्ह्यातील ८५ लघू प्रकल्प आणि पाच मध्यम प्रकल्पांमध्ये ९० टक्के पाणीसाठा झाला आहे.

Team Agrowon

सांगली ः जिल्ह्यातील ८५ लघू प्रकल्प आणि पाच मध्यम प्रकल्पांमध्ये ९० टक्के पाणीसाठा (Water Storage) झाला आहे. जवळपास ६३ लघू प्रकल्प आणि चार मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे रब्बी आणि उन्हाळी सिंचनाची (Irrigation) चिंता मिटल्यामुळे शेतकरी समाधानी आहे.

जिल्ह्यातील ८५ लघू आणि पाच मध्यम प्रकल्पांची दहा हजार ९२९.६२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा करण्याची क्षमता आहे. या प्रकल्पांमध्ये सध्या नऊ हजार ७२२ दशलक्ष घनफूट म्हणजेच ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच तारखेला केवळ ६६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. म्हणूनच टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना चालू करून जिल्ह्यातील लघू आणि मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा केला होता.

या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे नोव्हेंबर महिना निम्मा संपला तरीही सिंचन योजना सुरू करून आवर्तन सुरू करावे लागले नाही. जिल्ह्यातील लघू प्रकल्पात ९० टक्के आणि मध्यम प्रकल्पांत ८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांची रब्बी व उन्हाळी हंगामातील सिंचनाची चिंता मिटली आहे. जिल्ह्यातील ६३ पाझर तलाव तुडुंब भरले आहेत. जिल्ह्यातील प्रकल्प आणि पाझर तलावांत पाणीसाठा झाल्याने रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

६३ लघू प्रकल्प १०० टक्के भरले

जिल्ह्यात ८५ लघु प्रकल्प असून त्यापैकी ६३ लघु प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. उर्वरित २२ पाझर तलावांपैकी जत तालुक्यातील दरीबडची ३० टक्के, तिकोंडी क्रमांक एक ७ टक्के, सोरडी ३० टक्के आणि सिद्धनाथ ४० टक्के भरले आहेत. उर्वरित १७ लघू प्रकल्पांमध्ये ८५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.

मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)

प्रकल्प एकूण पाणीसाठा सध्याचा पाणीसाठा टक्केवारी

दोड्डानाला २४७.७५ १९६.९१ ८५

संख ७०३.८२ ७०३.८२ १००

बसाप्पावाडी २७४.७५ २७४.७५ १००

मोरणा ७४७.९७ ७४७.९७ १०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

Akola Heavy Rainfall: अकोला जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सून पावसाची दमदार हजेरी

Seed Ball Making: सीड बॉल निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Marathwada Rain 2026: छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT