Agriculture Scheme  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Scheme : कृषी योजनांचा लाभ हवा, क्युआर कोड स्कॅन करा

QR Code For Agriculture Scheme : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून राज्य आणि केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येतात. त्याशिवाय जिल्हा परिषदेच्या सेस फंडातूनही काही योजना स्वतंत्रपणे राबवण्यात येतात.

सुदर्शन सुतार

Solapur News : कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सोपा आणि सुटसुटीत पर्याय उपलब्ध करून दिला असून, योजनांच्या माहितीसह त्यासाठीचा अर्ज शेतकऱ्यांना सहज मिळावा, यासाठी त्या-त्या योजनांचा क्युआर कोड असणारी खास माहिती पुस्तिका तयार केली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, जिल्हा कृषी अधिकारी नंदकुमार पाचकुडवे, सहायक प्रशासनाधिकारी विवेक लिंगराज, कृषी विस्तार अधिकारी सचिन चव्हाण यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून राज्य आणि केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येतात. त्याशिवाय जिल्हा परिषदेच्या सेस फंडातूनही काही योजना स्वतंत्रपणे राबवण्यात येतात.

सुमारे ४५ पानांची ही माहिती पुस्तिका असून, सोलापूर जिल्ह्याच्या शेतीसंबंधीची माहिती आणि कृषी विभागाशी संबंधित जिल्हा स्तरावरील कार्यालय आणि अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक त्यात आहेत, तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या कोणकोणत्या योजना, कोण-कोणत्या घटकासाठी आहेत. त्याची सविस्तर माहिती त्यात आहे, तसेच योजनांचे अनुदान, निकष आणि अटीं यांची माहिती आहे.

प्रत्येक योजनेच्या माहितीच्या खाली स्वतंत्र क्युआर कोड दिलेला आहे, तो स्कॅन केल्यानंतर थेट मोबाईलवर त्या योजनेची माहिती मिळतेच, पण महत्त्वाचे म्हणजे त्यासाठीचा अर्जही त्यावर मिळतो. एरवी योजनेची नेमकी माहिती आणि त्यासाठीचा अर्ज यासाठी पंचायत समिती वा जिल्हा परिषदेकडे हेलपाटे मारावे लागत होते, पण आता शेतकऱ्यांची ही सर्व धावपळ या उपक्रमामुळे थांबली आहे.

कृषी विभागाच्या योजनांच्या माहितीसह या पुस्तिकेत खते, बियाणे, कीटकनाशकांची खरेदी करताना काय काळजी घ्यावी, माती-पाणी परीक्षण नेमके कसे होते, त्यासाठीचे नमुने कसे घ्यायला हवे, यासह महाडीबीटीवर अर्ज कसा करावा, याच्या प्रत्येक स्तरांची माहिती आणि त्यासाठीची वेबसाईटसची लिंकही त्यावर देण्यात आली आहे. तसेच कृषी विभागाचा टोलफ्री क्रमांकही त्यात आहे.

पंचायत समितीस्तरावर पुस्तिका, कोडचे फलक

कृषी विभागाने काढलेल्या या पुस्तिका केवळ जिल्हा परिषदेतच नव्हे, तर तालुकास्तरावर पंचायत समितीमध्येही ठेवण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक पंचायत समितीमध्ये योजनांचे क्युआरकडे असणारे डिजिटल फलकही लावण्यात ठळकपणे लावण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत ६ निर्णय; अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचनासाठी मंजुरी

Unseasonal Rain: राज्यात ३ दिवस गारपीटीचा अंदाज; पुढील ४ दिवस वादळी पावसासाठी पोषक हवामान

Agriculture Management: पिकातील अवशेषांचे व्यवस्थापन

Water Scarcity: काही शिवारांत पाणीटंचाईची स्थिती

World Happiness Report 2026: आनंदी समाज हाच खरा विकास

SCROLL FOR NEXT