Government Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Maize Procurement : मका, ज्वारीची १ नोव्हेंबरपासून खरेदी

या हंगामात जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत राज्य शासनातर्फे हमीदरात मका, ज्वारी आणि बाजरी खरेदीसाठी नोंदणी सुरू असून १० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

टीम ॲग्रोवन

बुलडाणा : या हंगामात जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत (Minimum Support Price Scheme) राज्य शासनातर्फे हमीदरात मका, ज्वारी आणि बाजरी खरेदीसाठी (Millet Procurement) नोंदणी (Maize, sorghum and millet Registration) सुरू असून १० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही खरेदी १ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी २०२३ दरम्यान केली जाणार आहे.

विक्रीसाठी आतापर्यंत सुमारे साडे सहाशे शेतकऱ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी दिली.

या हंगामातील मका, ज्वारी, बाजरी खरेदीला येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू केली जाणार आहे. मका १९६२ रुपये, ज्वारी २९९० (मालदांडी) आणि ज्वारी २९७० (संकरित) दराने खऱेदी केली जाईल. या केंद्रावर हा शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणे सुरू झाली आहे.

यंदा पहिल्यांदाच नावनोंदणीसाठी शेतकऱ्यांनी संस्थेत स्वत: हजर राहून छायाचित्र काढणे बंधनकारक आहे. तसेच नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी या हंगामाचा सात-बारा उतारा, पिकपेरा, स्पष्ट खाते क्रमांक दिसणारे बँक पासबुकची झेरॉक्स (जनधन पासबुक देण्यात येऊ नये), आधारकार्ड ही कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT