Pune APMC  Agrowon
ताज्या बातम्या

Pune APMC : अडत्यांपुढे बाजार समिती हतबल; प्रतिज्ञापत्राच्या आदेशाला केराची टोपली

Team Agrowon

Pune News : पुणे बाजार समितीमधील फळे-भाजीपाला विभागातील डमी अडत्यांना चाप लावण्यासाठी संचालक मंडळाने काढलेल्या आदेशाला अडत्यांनी केराची टोपली दाखविली आहे. एक महिन्यानंतरही एकाही अडत्याने प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने बाजार समिती संचालक मंडळ आणि प्रशासन अडत्यांपुढे हतबल झाले आहे.

हतबल झालेल्या प्रशासनाने अखेर कारवाईचे हत्यार उपसले असून, मंगळवारपासून (ता.२५) शेतमाल जप्तीच्या कारवाईचे संकेत दिले आहे. मात्र, अडत्यांवर खरोखरच कारवाई होणार की, केवळ फार्स ठरणार हे कारवाईदरम्यान कळणार आहे.

बाजार समितीमध्ये डमी अडत्यांचा सुळसुळाट झाला असून, या सुळसुळाटाला अडते असोसिएशनच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची चर्चा आहे.

अडते असोसिएशनसह बाजार आवारातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या अडतीच्या मूळ व्यवसायातून निवृत्ती घेत, इतर व्यवसायात बस्तान बसविले आहे. तर बाजार समितीमधील गाळे पाचपेक्षा जास्त डमी अडत्यांना बेकायदा पद्धतीने भाडेतत्वावर देत, भाडे घेण्याचा उद्योग सर्रास झाला आहे.

यामुळे बाजार आवारात दोन हजारांपेक्षा अधिक डमी अडते कार्यरत असून, यांच्यावर निर्बंध आणण्यासाठी संचालक मंडळाने गाळ्यावर केवळ दोन जणांना कामावर ठेवण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना, संबंधित दोन कामगारांचे छायाचित्र, निवासी पुराव्यासह प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश १७ जून २०२३ रोजी काढले होते.

या परिपत्रकानुसार २० जून अखेर प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र दीड महिना होऊन गेला तरी निर्ढावलेल्या अडत्यांनी एकही प्रमाणपत्र सादर केलेले नाही.

बाजार आवाराला शिस्त लावण्यासाठी आणि डमी अडत्यांवर नियंत्रणासाठी १७ जून २०२३ रोजी परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या होत्या. यानंतरही सातत्याने स्‍मरणपत्र देऊनही एकाही अडत्याने प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही. मंगळवार (ता.२५) पासून शेतमाल जप्तीच्या कारवाईला प्रारंभ करणार आहोत.
- महेंद्र काळभोर, विभाग प्रमुख, फळे भाजीपाला, बाजार समिती, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT